scorecardresearch

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेणं शक्यच नाही – निवडणूक आयोग

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेणे शक्य नाही असे मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी.रावत यांनी म्हटले आहे. आवश्यक कायदेशीर तरतुदीशिवाय हे शक्य नसल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेणे शक्य नाही असे मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी.रावत यांनी म्हटले आहे. आवश्यक कायदेशीर तरतुदीशिवाय हे शक्य नसल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. रावत यांनी औरंगाबाद येथे निवडक प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना पुन्हा एकदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेणे शक्य आहे का? हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हे शक्यच नाही असे उत्तर दिले.

पुढच्यावर्षी एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोराम या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका या वर्षअखेरीस डिसेंबरमध्ये होणार आहेत.

मागच्याच आठवडयात त्यांनी निवडणूक आयोग चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभा निवडणूक घेण्यास सक्षम आहेत असे म्हटले होते. डिसेंबरमध्ये चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसह लोकसभेची निवडणूक घेण्यास आम्ही तयार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. भाजपानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’ची चर्चा सुरु केली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Simultaneous loksabha vidhan sabha polls not possible