Bollywood Singer KK Died प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच के के चं निधन झालं आहे. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच त्याचं निधन झालं. तो ५४ वर्षांचा होता.

नक्की पाहा >> Video: ‘हम रहें या न रहें कल…’ ठरलं ‘केके’चं शेवटचं गाणं; कॉन्सर्टमधील शेवटचे काही क्षण झाले Viral

केके कोलकात्यामधील गुरुदास कॉलेजमधील नाझरुल मंचच्या कार्यक्रमामध्ये गात असतानच त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो त्याच्या हॉटेल रुममध्ये परतला. मात्र त्याची प्रकृती खालावल्यानंतर त्याला कोलकात्यामधील सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झाल्याचं सांगितलं जात आहे.

नक्की वाचा >> मृत्यूच्या काही वेळ आधीच ‘केके’ने Instagram वरुन पोस्ट केलेले दोन फोटो; कॅप्शनमध्ये म्हणाला होता, “आज रात्री…”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केकेच्या मृत्यूच्या बातमीनंतर ट्विटरवरुन खेद व्यक्त केलाय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी सकाळी त्याची पत्नी आणि मुलं कोलकात्यामध्ये दाखल होणार आहेत. मागील दोन दिवसांत केकेने कोलकात्यात दोन कॉन्सर्ट केले होते.