प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी रात्री कोलकात्यामध्ये निधन झालं आहे. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच त्याचं रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी निधन झालं. तो ५३ वर्षांचा होता. विशेष म्हणजे तासाभरपूर्वी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर गाणारा केके अचानक आपल्याला सोडून गेल्याच्या गोष्टीवर चाहत्यांचा विश्वास बसत नाहीय. मृत्यूच्या काही वेळापूर्वीच केकेनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केलेले फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

नक्की पाहा >> Video: ‘हम रहें या न रहें कल…’ ठरलं ‘केके’चं शेवटचं गाणं; कॉन्सर्टमधील शेवटचे काही क्षण झाले Viral

केके कोलकात्यामधील एका कॉलेजमध्ये नाझरुल मंचच्या कार्यक्रमात गात असतानच त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो त्याच्या हॉटेल रुममध्ये परतला. मात्र त्याची प्रकृती खालावल्यानंतर त्याला कोलकात्यामधील सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला ब्रॉट डेड म्हणजेच रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, असं घोषित केलं. केकेसोबत घडलेल्या या साऱ्या प्रकारच्या काही वेळ आधीच त्याने इन्स्टाग्रामवरुन या कार्यक्रमातील फोटो शेअर केले होते.

नक्की वाचा >> विश्लेषण : ‘नव्वद’ची पिढी नि ‘केके’चे गारूड… काय होते हे समीकरण?

“आज रात्री विवेकानंद कॉलेजमध्ये ‘नाझरुल मंच’च्या स्टेजवरुन गाणी सादर करतोय, तुम्हा साऱ्यांना फार प्रेम”, अशा कॅप्शनसहीत केकेने या कार्यक्रमातील दोन फोटो शेअर केले. हे फोटो मंचावरुन काढण्यात आले असून केके कॅमेराकडे पाठ करुन उभा असल्याचं दिसत असून त्यांच्या समोर चाहत्यांची गर्दी दिसत आहे.

एक दिवस आधी म्हणजेच सोमवारी केकेने मुंबई विमानतळावरुन आपल्या टीमसोबत आपण कॉन्सर्टसाठी कोलकात्याला जात असल्याचं सांगत एक सेल्फीही पोस्ट केलेला.

View this post on Instagram

A post shared by KK (@kk_live_now)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कॉन्सर्टमधील शेवटच्या काही मिनिटांमध्ये केकेने ‘कल हम रहे न रहें कल.. याद आऐंगे ये पल…’ गाणं गातच चाहत्यांचा निरोप घेतला. ‘यारों दोस्‍ती बड़ी ही हसीन है…’ हे गाणंही त्याने या कॉन्सर्टमध्ये गायलं होतं.