बीजिंग- चीनमध्ये वायव्येकडील शिनजियांग प्रांतात मोठा भूकंप झाला असून त्यात ६ ठार तर इतर ४८ जण जखमी झाले आहेत, या भूकंपाची तीव्रता ६.५ रिश्टर होती.शिनजियांगच्या होटान परफेक्चर भागात हा धक्का बसल्याचे चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटरने म्हटले आहे. भूकंपाच्या धक्क्य़ाने सकाळी ९ वाजून सात मिनिटांनी पिशान पगण्याचा भाग हादरला, त्या भूकंपाची खोली १० किलोमीटर होती.शिनजियांग प्रांतातील नागरी प्रशासन विभागाने सांगितले, की सहा जण मरण पावले असून तीन हजार इमारती कोसळल्या आहेत, भूरंपात ४८ लोक जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jul 2015 रोजी प्रकाशित
चीनमधील भूकंपात सहा ठार
चीनमध्ये वायव्येकडील शिनजियांग प्रांतात मोठा भूकंप झाला असून त्यात ६ ठार तर इतर ४८ जण जखमी झाले आहेत
First published on: 04-07-2015 at 03:53 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six killed in china earthquake