श्रीलंकेने भारतीय रुपयाला आंतरराष्ट्रीय चलनाचा दर्जा दिला आहे. श्रीलंकेने त्यांच्या प्रणालीमध्ये भारतीय चलनाला नियुक्त चलन (विशेष परकीय चलन) म्हणून स्थान दिलं आहे, याबाबतची माहिती भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बाग्ची यांनी गुरुवारी (२० जुलै) दिली. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाचं वजन वाढणार आहे. बाग्ची म्हणाले, आपल्या चलनात व्यापार आणि व्यवहार करण्यासाठी श्रीलंकेने त्यांच्या प्रणालीमध्ये भारतीय रुपयाचा नियुक्त परकीय चलन म्हणून समावेश केला आहे. बाग्ची यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची माहिती दिली.

श्रीलंका सरकारने भारतीय रुपयाला नियुक्त परकीय चलनाचा दर्जा दिल्यामुळे दोन देशांमधील व्यापार रुपयांमध्ये होऊ शकणार आहे. यासह श्रीलंकेत फिरायला जाणारे भारतीय पर्यटकही भारतीय रुपयांमध्ये व्यवहार करू शकतील.

UPSC Preparation Overseas Indians International relations study unit
UPSCची तयारी: परदेशस्थ भारतीय
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
UPSC Preparation International Association
upsc ची तयारी: आंतरराष्ट्रीय संघटना
most overworked countries
Most Overworked Countries in World : जगातील कोणत्या देशात सर्वाधिक तास काम करावं लागतं? भारतात किती तास काम केलं जातं?
upsc mains exam marathi news
UPSC ची तयारी: भारत आणि जग
Saleema Imtiaz becomes first Pakistans woman umpire on ICCs International Development Panel
Saleema Imtiaz : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंपायर बनणारी पहिली पाकिस्तानी महिला कोण आहे? जाणून घ्या
Traditional Outfit Ideas to Dress for Ganesh Chaturthi 2024
नावीन्यपूर्ण परंपरा
retail inflation rises to 3 65 percent in august second lowest level in 5 years
किरकोळ महागाई ऑगस्टमध्ये वाढून ३.६५ टक्क्यांवर; मात्र पाच वर्षातील दुसरा नीचांकी स्तर

अरिंदम बाग्ची म्हणाले की, भारतीय चलनाचा वापर भारताच्या खासगी क्षेत्रावर अवलंबून असेल, तसेच व्यापार क्षेत्रातील लोकांवर अवलंबून असेल. उभय देशांमधील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचा आपला प्रयत्न आहे. २१ जुलै रोजी होणाऱ्या भेटीत (आज श्रीलंकेचे अध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट होणार आहे.) याबद्दलची चर्चा होईल. त्यामुळे आत्ताच त्यावर अधिक बोलणं ही घाई ठरेल.

श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे काल (२० जुलै) संध्याकाळी दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. विक्रमसिंघे भारतीय भूमीवर उतरण्याच्या काही तास आधी बाग्ची यांनी उभय देशांमधील चलनाच्या देवाण-घेवाणीची माहिती दिली. विक्रमसिंघे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत दौऱ्यावर आमंत्रित केलं आहे. मोठ्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असलेल्या श्रीलंकेच्या अध्यक्षांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

हे ही वाचा >> एसीसी, अंबुजा सिमेंटचे विलीनीकरण नाही, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कपूर यांचे स्पष्टीकरण

गोटाबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेतून पलायन केल्यानंतर विक्रमसिंघे यांनी जुलै २०२२ मध्ये श्रीलंकेचं अध्यक्षपद स्वीकारलं. त्यानंतर विक्रमसिंघे यांचा हा पहिलाच भारत दौऱा आहे. या दौऱ्यात विक्रमसिंघे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटतील. त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटतील, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केली आहे.