scorecardresearch

Premium

Video: “मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का?” श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांची ममता बॅनर्जींना विचारणा; प्रश्नानंतर पिकला हशा!

ममता बॅनर्जींची दुबई विमानतळावर रनिल विक्रमसिंघे यांच्याशी भेट झाली. त्यावेळी दोघांमध्ये काही काळ चर्चाही झाली.

ranil wickremesinghe mamata banerjee video
रनिल विक्रमसिंघे यांच्या प्रश्नावर हसू लागल्या ममता बॅनर्जी! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम/पीटीआय)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या १२ दिवसांच्या दुबई व स्पेनच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, आपल्या दौऱ्यादरम्यान ममता बॅनर्जींची दुबई विमानतळावर अनपेक्षितपणे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रनिल विक्रमसिंघे यांची भेट झाली. यावेळी रनिल विक्रमसिंघे यांनी ममता बॅनर्जींना विचारलेल्या एका प्रश्नाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रश्नानंतर खुद्द ममता बॅनर्जी यांनीही रनिल विक्रमसिंघे यांच्या प्रश्नावर दिलखुलास दाद दिल्याचं व्हिडीओत दिसत आहे. पीटीआयनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.

काय घडलं नेमकं?

ममता बॅनर्जी आपल्या १२ दिवसांच्या दौऱ्यासाठी दुबईला दाखल झाल्या असताना विमानतळावरच त्यांची रनिल विक्रमसिंघे यांच्याशी भेट झाली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी रनिल विक्रमसिंघे यांना कोलकात्यात पुढील महिन्यात होणाऱ्या ग्लोबल बिझनेस समिटमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं. तसेच, विक्रमसिंघे यांनीही ममता बॅनर्जींना श्रीलंकेला येण्याचं आमंत्रण दिलं. खुद्द ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर यासंदर्भात माहिती दिली आहे.

nafe singh rathee
हरियाणामध्ये गोळ्या झाडून हत्या झाली ते आयएनएलडी प्रदेशाध्यक्ष नफेसिंह राठी कोण होते?
Praful Patel Ajit Pawar
खासदारकीची चार वर्षे बाकी असूनही उमेदवारी अर्ज का भरला? अजित पवार गटाला कशाची भीती? प्रफुल्ल पटेल म्हणाले…
narendra modi loksabha
काँग्रेसवर सडकून टीका, घराणेशाहीचे आरोप, विजयाचा विश्वास; १७ व्या लोकसभेतील पंतप्रधानांच्या शेवटच्या भाषणातील पाच मुख्य मुद्दे
south korea s first lady s dior bag scandal marathi news, dior bag scandal marathi news
विश्लेषण : अध्यक्षांच्या पत्नीस भेट मिळाली चक्क २२५० डॉलरची बॅग! दक्षिण कोरियाचा सत्ताधारी पक्ष त्यामुळेच अडचणीत सापडला?

विक्रमसिंघेंचा प्रश्न आणि दिलखुलास दाद!

दरम्यान, या भेटीच्या वेळी रनिल विक्रमसिंघे यांनी ममता बॅनर्जींची रीतसर परवानगी घेऊन त्यांना एक प्रश्न केला. ममता बॅनर्जींनीही त्याला दिलखुलासपणे उत्तर दिलं. “मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो का?” असं विक्रमसिंघे यांनी विचारताच ममता बॅनर्जींनी “हो, प्लीज विचारा”, असं म्हणत होकारार्थी उत्तर दिलं.

विरोधकांच्या आघाडीचं नेतृत्व!

रनिल विक्रमसिंघे यांनी ममता बॅनर्जींना विरोधी पक्षांच्या आघाडीसंदर्भात प्रश्न विचारला. “तुम्ही विरोधी पक्षांच्या आघाडीचं नेतृत्व करणार का?” असं रनिल विक्रमसिंघे यांनी विचारल्यावर ममता बॅनर्जींनी “हे लोकांवर अवलंबून आहे ना”, असं म्हणत सविस्तर उत्तर देणं टाळलं. मात्र. त्याचवेळी, “विरोधी पक्ष यावेळी सरकारला टक्कर देण्याच्या पूर्ण स्थितीत असेल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sri lanka president ranil wickremesinghe asks mamata banerjee on opposition leadership video viral pmw

First published on: 13-09-2023 at 17:47 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×