एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील घरावर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक करण्यात आली आहे. ओवेसी यांनी ट्वीट करत स्वत: याबाबत माहिती दिली. रविवारी सांयकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – ‘अदानी’च्या आर्थिक व्यवहारांमुळे ईएसजी गुंतवणूकदार चिंतेत

यासंदर्भात बोलताना, “माझ्या दिल्लीतील घरावर पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला आहे. २०१४ पासून ही चौथी घटना आहे. रविवारी सायंकाळी मी जयपूरहून परतल्यानंतर मला माझ्या दिल्लीतील सहकाऱ्यांनी या हल्ल्याबाबत माहिती दिली. या दगडफेकीत खिडकीची काच फुटली आहे”, अशी माहिती ओवेसी यांनी दिली. तसेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली असून पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिल्ली पोलिसांनी दिली.