पीटीआय, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टाईन प्रशासनाचे अध्यक्ष मोहम्मद अब्बास यांच्याबरोबर गुरूवारी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी गाझातील अल-अहली रुग्णालयावरील हल्ल्यात झालेल्या मृत्यूंबाबत मोदी यांनी दु:ख व्यक्त केले. पॅलेस्टिनी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचे आश्वासन देतानाच इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्दय़ावरील आपली दीर्घकालीन भूमिका कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले असले तरी दहशतवाद आणि हिंसेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
हमासने इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा करून युद्धाला पाठिंबा देऊ केला होता. त्यानंतर आता गाझातील रुग्णालयात झालेल्या स्फोटानंतर दोन दिवसांनी त्यांनी प्रथमच अब्बास यांच्याशी संवाद साधला. दहशतवाद, हिंसाचार आणि पश्चिम आशियातील ढासळती सुरक्षाव्यवस्था यावर यावेळी मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. मानवतेच्या दृष्टिकोनातून पॅलेस्टिनी नागरिकांना दिली जाणारी मदत यापुढेही सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी अब्बास यांना दिली.
हेही वाचा >>>युद्धादरम्यान पाठिंब्यासाठी रशियाकडून उत्तर कोरियाचे आभार
युद्धामध्ये आंतरराष्ट्रीय नियमांचे कठोरपणे पालन केले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करत एका अर्थी व्यक्त केली आहे. युद्धामध्ये होणारी मनुष्यहानी आणि मानवतावादी परिस्थिती याबद्दल भारताला चिंता वाटत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अिरदम बागची यांनी नवी दिल्लीत स्पष्ट केले. भारत द्विराष्ट्रीय उपायाच्या बाजूने म्हणजेच इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांच्या निर्मितीच्या बाजूने आहे असे बागची म्हणाले.
हेही वाचा >>>नव्या जलदगती रेल्वेचे ‘नमो भारत’ नामकरण; दिल्ली-मेरठ मार्गावरील पहिल्या गाडीचे आज उद्घाटन
नियमांचे पालन करा – परराष्ट्र मंत्रालय
इस्रायल-हमास युद्धात आंतरराष्ट्रीय नियमांचे काटेकोरपणे पालन केले जावे, अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली आहे. युद्धातील मनुष्यहानी आणि मानवतावादी परिस्थिती याबद्दल भारताला चिंता असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अिरदम बागची यांनी नवी दिल्लीत स्पष्ट केले. द्विराष्ट्रीय संकल्पनेला भारताचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ऐतिहासिक संबंध भारत आणि पॅलेस्टाईनचे
संबंध पहिल्यापासून कमालीचे सौदार्हाचे राहिले आहेत. पॅलेस्टाईन मुक्ती संग्रामाचे प्रणेते दिवंगत यासर अराफत हे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आपली छोटी बहीण मानत असत. १९७४ साली अराफत यांच्या पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेला पाठिंबा देणारा भारत हा पहिला बिगर-अरब देश ठरला होता.