scorecardresearch

१३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ८० नराधमांचा आठ महिने बलात्कार; अटक केलेल्यांमध्ये विद्यार्थी; ५३ फोन, तीन ऑटो, एक बाईक जप्त

मुलीच्या आईचा करोनाने मृत्यू झाल्यानंतर महिलेने देहव्यापारात ढकललं; आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील वेगवेगळ्या ठिकाणी पाठवत लैंगिक शोषण

तेलंगणामध्ये १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर आठ महिने बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणीला जबदस्तीने देहविक्री व्यवसायात ढकलण्यात आलं होतं. पोलिसांना गुंटूर येथून या मुलीची सुटका केली आहे. पोलिसांनी तपास केला असता आठ महिन्यात तब्बल ८० जणांनी या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचं समोर आलं.

सामूहिक बलात्काराने डोंबिवली हादरलं; ३० जणांनी मिळून १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर केले लैंगिक अत्याचार

पोलिसांनी याप्रकरणी सर्व ८० नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी मंगळवारी १० जणांना अटक केली असून यामध्ये एका बी.टेक विद्यार्थ्याचाही समावेश आहे. अजून काही आरोपी यामध्ये सामील असण्याची शक्यता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पीडित मुलीची आई करोना झाल्याने जून २०२१ मध्ये रुग्णालयात दाखल होती. यावेळी सवर्ण कुमारी नावाच्या एका महिलेने तिच्या आईशी मैत्री केली होती. उपाचारादरम्यान आईचा मृत्यू झाल्यानंतर महिलेने तिच्या वडिलांना माहिती न देता सोबत घेऊन गेली होती.

वडिलांनी दाखल केली तक्रार

ऑगस्ट २०२१ मध्ये पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांना मुख्य आरोपी असणाऱ्या सवर्ण कुमार या महिलेची ओळख पटली. जानेवारीमध्ये याप्रकरणी पहिली अटक करण्यात आली. आणि मंगळवारी १९ एप्रिलला पोलिसांनी आणखी १० जणांना अटक केली ज्यामध्ये एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. यावेळी त्यांनी पीडित मुलीची सुटका केली.

धक्कादायक माहिती समोर

पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता तसंच मुलीकडे विचारपूस केली असता संपूर्ण धक्कादायक घटनाक्रम समोर आला. गेल्या आठ महिन्यांपासून या १३ वर्षीय मुलीला आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील वेगवेगळ्या ठिकाणी देहव्यापारासाठी पाठवलं जात होतं. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सवर्ण कुमारी या महिलेला मुलीला जबरदस्तीने देहव्यापारात ढकलल्याने मुख्य आरोपी केलं.

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक; आतापर्यंत २८ आरोपींना बेड्या

अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, ८० आरोपींची ओळख पटली असून यापैकी काही दलाल तर काही ग्राहक आहेत. “मुलीचं वय आणि तिच्या परिस्थितीचा फायदा घेत अनेकांनी तिला खरेदी केलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेत देहव्यापार करण्यास भाग पाडलं,” असं त्यांनी सांगितलं आहे.

एक आरोपी लंडनमध्ये

काही आरोपी फऱार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. यामधील एक आरोपी लंडनमध्ये असल्याचं अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे. पोलिसांनी आरोपींकडून एक कार, ५३ फोन, तीन ऑटो, एक बाईक जप्त केली आहे. विजयवाडा, हैदराबाद, नेल्लोर येथून आरोपींना अटक करण्यात आली. पोलीस सध्या फरार असणाऱ्या इतर आरोपींचा शोध घेत आहोत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Telangana minor gang raped by 80 men for 8 months sgy