scorecardresearch

छत्तीसगडमध्ये  तीन पोलीस शहीद

रायपूरपासून चारशे किलोमीटरवर असलेल्या जगरगुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून या पथकाने कारवाई सुरू केली होती.

naxals killed colleague
(संग्रहित छायाचित्र)

रायपूर : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात शनिवारी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका सहायक उपनिरीक्षकासह दोन जिल्हा राखीव रक्षक जवान (डीआरजी) शहीद झाले, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. ‘डीआरजी’ पथक शोध मोहिमेवर असताना जगरगुंडा व कुंदेड गावांदरम्यान सकाळी नऊच्या सुमारास ही चकमक उडाली, असे पोलीस महानिरीक्षक (बस्तर श्रेणी) सुंदरराज पी. यांनी सांगितले. त्यांनी सांगितले, की राजधानी रायपूरपासून चारशे किलोमीटरवर असलेल्या जगरगुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून या पथकाने कारवाई सुरू केली होती. यावेळी झालेल्या गोळीबारात सहायक उपनिरीक्षक रामुराम नाग, सहाय्यक हवालदार कुंजम जोगा व वंजाम भीमा यांचा शहीद झाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-02-2023 at 04:36 IST