पश्चिम बंगालमधील तीन महिलांचा दंडवत करतानाचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमुळे राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. असं म्हटलं जात आहे की, या तीन आदिवासी महिलांनी रस्त्यावर दंडवत केला आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दुसऱ्या बाजूला भाजपाने आरोप केला आहे की, या महिलांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. परंतु नंतर त्या तृणमूलमध्ये गेल्या. भाजपात गेल्याची शिक्षा म्हणून तृणमूलने त्या तीन महिलांना भर रस्त्यावर दंडवत करायला सांगितलं.

ही घटना बालुरघाटमधील तपन भागातली आहे. येथील तीन महिलांनी तब्बल एक किलोमीटरपर्यंत दंडवत केला. त्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भर रस्त्यात या महिलांना दंडवत करताना पाहून लोकांनाही धक्का बसला होता. तर तृणमूलने याबाबत म्हटलं आहे की प्रायश्चित्त म्हणून त्यांनीच दंडवत घातला. या महिलांनी भाजपाच्या स्थानिक कार्यालयाजवळून टीएमसीच्या दक्षिण दिनाजपूर जिल्हा मुख्यालयापर्यंत दंडवत घातला.

दरम्यान, यापैकी एका महिलेचा पती जो स्थानिक टीएमसी नेता आहे, त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, पक्षातील स्थानिक नेत्यांकडून हे करण्यासाठी दबाव होता. परंतु हे स्थानिक उच्पदस्थ नेते कोण आहेत? असा सवाल केल्यानंतर त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला.

“प्रायश्चित्त म्हणून परिक्रमा”

दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील तृणमूल महिला काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप्ता चक्रवर्ती यांनी दावा केला आहे की, तीन महिलांची भाजपामध्ये सामील होण्यासाठी दिशाभूल करण्यात आली होती. त्यानंतर टीएमसीत परत येण्यापूर्वी प्रायश्चित्त म्हणून त्यांनी परिक्रमा केली.

हे ही वाचा >> “…तेव्हा कोणाचे पाय पकडले?” नितेश राणेंचा ठाकरे पिता-पुत्रांना सवाल, म्हणाले, “लवकरच गौप्यस्फोट…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपा महिला आयोगाकडे तक्रार करणार?

याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार म्हणाले की, “या तिन्ही महिलांनी टीएमसी सोडून भाजपात प्रवेश केला होता, मात्र या तिघींनाही टीएमसीमध्ये परतायचे होते, तेव्हा त्यांना दंडवत करावा लागला.” दरम्यान, भाजपा याप्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करणार आहे.