NIRF Rankings 2025 Top 10 Universities and Colleges : शिक्षण मंत्रालयाने देशातील १० सर्वोत्तम विद्यापीठे व महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहेत. शिक्षण मंत्रालयाने एनआयआरएफ (National Institutional Ranking Framework) रँकिंग्स जाहीर केले आहेत. या क्रमवारीमुळे विद्यार्ध्यांना महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये प्रवेश घेताना त्यांचा प्राधान्यक्रम ठरवताना मदत होते. आपण चांगल्या शिक्षण संस्थेत शिक्षण घ्यावं असं प्रत्येकाला वाटत असतं. अशा वेळी एनआयआरएफची क्रमवारी उपयोगी पडते. याद्वारे विद्यार्थ्यांना अभियांत्रिक, वैद्यकशास्त्र, भारतातील सर्वोत्तम विद्यापीठे, दंतवैद्यकीय, फार्मसी आणि इतर क्षेत्रांमद्ये त्यांच्या भविष्यासाठी सर्वोत्तम महाविद्यालये व विद्यापीठे निवडण्यास मदत होते.

शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या एनआयआरएफ क्रमवारीत काही महाविद्यालयांनी त्यांचं जुनं स्थान कायम ठेवलं आहे. तर, काही महाविद्यालये व विद्यापीठांनी त्यांची क्रमवारी सुधारली आहे आणि काहींची घसरण झाली आहे. दिल्लीमधील हिंदू महाविद्यालय व मिरांडा हाऊस या दोन महाविद्यालयांनी त्यांचं या क्रमवारीतील अनुक्रमे पहिलं व दुसरं स्थान कायम राखलं आहे. दरम्यान, एनआआरएफच्या क्रमवारीनुसार पहिल्या १० शिक्षण संस्थांमध्ये महाराष्ट्रातील एकही विद्यापीठ अथवा महाविद्यालय नाही.

शिक्षण संस्थांमधील उपलब्ध संस्थाने, विद्यार्थी संख्या, संशोधन संस्थांची गुणवत्ता,पदवीधर विद्यार्थांची संख्या आणि तिथे शिकलेल्या पदवीधरांनी केलेली समीक्षा या आधारावर सर्वेक्षण करून एनआयआरएफ क्रमवारी जारी केली जाते आणि सर्वोत्तम महाविद्यालये व विद्यापीठांची यादी तयारी केली जाते.

देशातील १० सर्वोत्तम महाविद्यालये व विद्यापीठे

महाविद्यालय / विद्यापीठराज्यगुणक्रमांक
हिंदू कॉलेजदिल्ली८४.०१
मिरांडा हाऊसदिल्ली८३.२
हंस राज कॉलेजदिल्ली८१.७५
किरोडीमल कॉलेजदिल्ली८०.३३
सेंट स्टीफन्स कॉलेजदिल्ली७९.४१
राम कृष्ण मिशन विवेकानंद महाविद्यालयपश्चिम बंगाल७६.७४
आत्माराम सनातन धर्म महाविद्यालयदिल्ली७६.०९
सेंट झेवियर्स कॉलेजपश्चिम बंगाल७६.०७
पीएसजीआर कृष्णमल महिला महाविद्यालयतामिळनाडू७५.५२
पीएसजी कला आणि विज्ञान महाविद्यालयतामिळनाडू७३.१५१०