लंडन : ट्विटरचा चिरपरिचित निळा पक्षी आता या प्रसिद्ध समाजमाध्यमावर दिसणार नाही. त्याऐवजी काळी-पांढरी फुली ट्विटरची खूण मानली जाणार आहे. ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी सोमवारी ‘ ’ हा नवीन लोगो लोकांसमोर आणला. ट्विटरचे हे मोठे रिब्रँडिंग मानले जात आहे. मस्क यांनी गेल्या वर्षी ४४ अब्ज डॉलरना ट्विटर खरेदी केले होते.
मस्क यांनी स्वत:च्या ट्विटर हँडलवर हा बदल करून त्याची प्रतिमा पोस्ट केली. सोमवारी डेस्कटॉपवर ट्विटरची काळय़ा पार्श्वभूमीवर पांढरी फुली दिसू लागली. मात्र फोनवरील अॅपमध्ये निळा पक्षीच मोठय़ा प्रमाणात दिसत होता. मस्क यांनी नवीन लोगोसाठी चाहत्यांकडून कल्पना मागवल्या होत्या. रिब्रँडिंगनंतर ट्वीट हे एक्स नावाने ओळखले जातील असेही मस्क यांनी स्पष्ट केले आहे.