रशियामधील एका अब्जाधिशाच्या मालकीची ‘फी’ नावाची सुपरयाट म्हणजेच मोठी आलिशान बोट मंगळवारी लंडनमध्ये जप्त केली. युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटन सरकारने प्रतिबंधांअंतर्गत ही सुपरयाट्स जप्त करण्याचा सपाटा ब्रिटीश सरकारने सुरु केलाय. त्यामध्ये ‘फी’ हे पहिलं जहाज ठरलं आहे. विशेष म्हणजे लंडन सोडण्याच्या तयारीत असलेलं हे जहाज बंदर सोडण्याच्या अगदी काही तास आधी त्यावर जप्तीची कारवाई करण्यात आल्याचं रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय गुन्हेगारी संस्था (एनसीए) च्या नव्या ‘कॉम्बॅक्टींग क्लेप्टोक्रेसी सेल’च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅनेरी वार्फ येथे उभ्या असणाऱ्या तीन कोटी ८० लाख रुपये किंमत असणारी बोट जप्त करण्यासंदर्भातील नोटीसही मालकांना पाठवण्यात आलीय. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांनी वेगाने यासंदर्भात काम करुन जहाजाचा मालक कोण आहे हे शोधून काढलं आणि त्यावर निर्बंध लादण्यासंदर्भातील कारवाई करता येईल असं सांगितल्याने हा जप्तीचा निर्णय घेण्यात आला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uk detains russian owned phi superyacht in london canary wharf scsg
First published on: 31-03-2022 at 08:11 IST