युक्रेनमधील युद्धाला सुरुवात होऊन एक आठवड्याचा कालावधी लोटला असून अजूनही या युद्धग्रस्त देशामध्ये हजारो भारतीय विद्यार्थ्यांसहीत पाकिस्तान आणि चीनचेही विद्यार्थी अडकून पडलेत. असं असतानाच मंगळवारी एका भारतीय विद्यार्थ्याच्या खर्किव्हमधील गोळीबारामध्ये मृत्यू झाला. (युद्धाच्या लाइव्ह अपडेट्ससाठी येथे क्लिक करा) भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न केले जात असतानाच आता रशिया आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या परदेशी विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. रशियाने युक्रेनियन सुरश्रा यंत्रणाच ढालीप्रमाणे परदेशी विद्यार्थ्यांचा वापर करत असल्याचा दावा केलाय. मात्र दुसरीकडे युक्रेनने थेट भारत, पाकिस्तान, चीन आणि ज्या देशांतील विद्यार्थी युक्रेनमध्ये आडकलेत त्या देशांना विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हवलवण्यासाठी मॉस्कोवर दबाव टाकण्याची मागणी केलीय.

नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांचा मोदींना कॉल, रशियाने केला धक्कादायक दावा; म्हणाले, “युक्रेननेच भारतीय…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक पत्रकच जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी, “युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून रशियला आव्हान करण्यात येतंय की त्यांनी खर्किव्ह आणि सुमे शहरांमध्ये ओलीस ठेवलेल्यांची सुटका करावी. रशियाने या लोकांची ज्यामध्ये परदेशी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे सुटका केल्यानंतर आम्ही त्यांना युक्रेनमधील सुरक्षित शहरांमध्ये स्थलांतरित करु. ओलीस ठेवण्यात आलेल्यांमध्ये भारत, पाकिस्तान, चीनमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. रशियाकडून सातत्याने नागरी वस्त्या आणि शहरांमध्ये सातत्याने होणारा बॉम्ब वर्षाव आणि क्षेपणास्त्रांच्या माऱ्यामुळे या अडकून पडलेल्यांना कुठेही जाता येत नाहीय,” असं म्हटलंय.

नक्की वाचा >> Ukraine War: “तिसरं विश्वयुद्ध झालं तर अण्वस्त्रांचा वापर होईल आणि…”; रशियाचं वक्तव्य

तसेच या पत्रकामध्ये, “युक्रेन सरकार परदेशातील विद्यार्थ्यांना खर्किव्ह आणि सुमे शहरामधून सुरक्षित स्थळी हळवण्यास तयार आहे. रशियाने यासाठी हल्ले बंद केले पाहिजेत. रशियाकडून सातत्याने ज्या शहरांमध्ये बॉम्ब हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ले होतायत तिथून या विद्यार्थ्यांना बाहेर काढणं फार धोकादायक आहे,” असंही स्पष्ट केलंय.

नक्की वाचा >> Ukraine War: मोठी बातमी! पुतिन यांनी Nuclear Attack च्या भीतीने आपल्या कुटुंबियांना…

“आम्ही भारत, पाकिस्तान, चीन बरोबरच इतर ज्या देशांचे विद्यार्थी रशियन हल्ल्यांमुळे खर्किव्ह आणि सुमे शहरात अडकून पडले त्यांना विनंती करतो की त्यांनी मॉस्कोवर दबाव आणून युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना इतर शहरांमध्ये सुरक्षित स्थलांतर करण्यासाठी रशियाकडून ‘मानवतावादी दृष्टिकोनातून मार्ग’तयार करुन घ्यावा,” अशी मागणी युक्रेन सरकारने केलीय. तसेच या पत्रकाच्या शेवटी, “युक्रेन सरकार परदेशी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे त्यांच्या मायदेशी परत पाठवण्यात सर्व ती मदत करण्यासाठी कटीबद्ध आहे,” असंही नमूद करण्यात आलंय.

नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांना मोठा धक्का! झेलेन्स्कींच्या हत्येसाठी पाठवलेल्या ‘चेचेन स्पेशल फोर्स’चा युक्रेनकडून खात्मा

युक्रेन-रशियालगतच्या पूर्व आणि ईशान्य भागात सुमारे चार हजार भारतीय अडकून पडले असून, त्यात बहुतांश वैद्यकीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्या सुटकेसाठी भारताने रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला जातोय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukraine foreign affairs ministry ask india pakistan china to demand for humanitarian corridor from russia to shift students in safe cities scsg
First published on: 03-03-2022 at 08:42 IST