पर्यायी इंधानाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज संसदेमध्ये हायड्रोजनवर चालणाऱ्या गाडीने आले. टोयोटा मिराई ही देशातील हायड्रोजनवर चालणारी पहिलीच गाडी आहे. भारतीय रस्त्यावर तसेच भारतीय हवामानामध्ये हायड्रोजनवर चालणाऱ्या या गाड्या कशा प्रभावी ठरतील यासंदर्भातील चाचण्या सध्या सुरु आहेत. त्याचअंतर्गत ही गाडी तयार करण्यात आलीय.
नक्की वाचा >> Photos: पेट्रोल-डिझेलपेक्षा फारच स्वस्त… गडकरींच्या Hydrogen कारचं Average पाहिलं का?
“आत्मनिर्भर होण्यासाठी आम्ही ग्रीन हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करण्याचे प्रयोग करतोय. हा हायड्रोजन पाण्यापासून तयार केला जातो,” असं गडकरींनी एएनआयशी बोलताना सांगितलं. “आता लवकरच आपल्या देशामध्ये ग्रीन हायड्रोजनचं उत्पादन सुरु होईल. त्यामुळे (इंधनाची) आयात कमी होईल. नवीन नोकरीच्या संधी निर्माण होतील,” असंही गडकरी म्हणाले.
हायड्रोजनची निर्यात करणारा देश म्हणून भारताला ओळख मिळावी या उद्देशाने तीन हजार कोटींची गुंतवणूक करुन संशोधन आणि त्यासंदर्भातील इतर प्रयत्न सुरु असल्याचा संदर्भ देत गडकरींनी, “सध्या जिथे जिथे कोळश्याचा वापर होतोय तिथे हायड्रोजनचा वापर केला जाईल,” असं म्हटलं आहे.
नक्की वाचा >> पेट्रोल भरण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिक गुजरातमध्ये; दरांमधील फरक पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
याच महिन्याच्या सुरुवातील गडकरींनी हायड्रोजनवर आधारित फ्युएलच सेल इलेक्ट्रीक व्हेइकलच्या उद्धटनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. झिरो एमिशन म्हणजेच शून्य प्रदुषण करणारी ही कार आहे. “टोयोटा ही जपानी कंपनी आहे. त्यांनी मला ही गाडी दिली असून ती ग्रीन हायड्रोजनवर चालते. मी स्वत: ती पर्यायी इंधन म्हणून पायलेट प्रोजेक्टच्या धर्तीवर वापरुन पाहणार आहे,” असं गडकरींनी यावेळी म्हटलं होतं.