उत्तर प्रदेशमध्ये करोनामुळे आणखी एका भाजपा आमदाराचा मृत्यू झाला आहे. रायबरेलीमधील सलोन विधानसभेचे भाजपा आमदार आणि माजी मंत्री दल बहादूर कोरी यांचं करोनामुळे निधन झालं आहे. दल बहादूर कोरी यांना एका आठवड्यापूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना लखनौच्या अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचं निधन झालं.

भाजपा आमदार दल बहादूर कोरी यांचा राम मंदिर आंदोलनात सक्रिय सहभाग होता. त्यांना दोनदा तुरुंगवासही भोगावा लागला आहे. १९९१ साली त्यांना पहिल्यांदा विधानसभेचं तिकीट मिळालं. तेव्हा ते पराभूत झाले होते. त्यानंतर १९९६ साली ते सलोन विधानसभेतून निवडून आले आणि राजनाथ सिंह मुख्यमंत्री असताना मंत्रिपद मिळालं. २००४ साली दल बहादूर कोरी यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये सहभागी झाले. मात्र २०१४ साली त्यांनी पुन्हा घरवापसी करत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर २०१७ साली भाजपाने त्यांना सलोन विधानसभेचं तिकीट दिलं आणि निवडून आले.

करोनाचा कहर! भारतात गेल्या १० दिवसांत तासाला १५० मृत्यू; अमेरिका, ब्राझीललाही टाकलं मागे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी ओरैया विधानसभेचे भाजपा आमदार रमेश दिवाकर, लखनौ पश्चिम विधानसभेचे सुरेश श्रीवास्तव, बरेलीच्या नवाबगंजमधील आमदार केसर सिंह गंगवार यांचं करोनामुळे निधन झाले आहे. केसर सिंह गंगवार यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने फेसबुकवरून मोदी आणि योगी सरकारवर निशाणा साधला होता.