मुंबईसध्ये आता उत्तर प्रदेश सरकाराचं कार्यलय सुरू होणार आहे. मुंबईमध्ये राहणा-या उत्तर भारतातील लोकांना मदत करण्यासाठी मुंबईत उत्तर प्रदेश सरकारचं कार्यालय सुरू करणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. मुंबईंमध्ये सुमारे ५० ते ६० लाख उत्तर भारतीय राहतात. या लोकांना येणा-या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी मदत व्हावी यासाठी उत्तर प्रदेशसरकारने हा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात काम बंद असल्यामुळे मुंबईत राहणा-या लाखो उत्तर भारतीय मजुरांची प्रचंड अडचण झाली होती. आता अश्या प्रकारची परिस्थिती उद्भवल्यास मुंबईतील कार्यालयाच्या माध्यामातून उत्तर प्रदेश सरकार त्या लोकांना मदत करेल. ज्या प्रमाणे प्रत्तेक देशात इतर देशांच्या दुतावासांचं कार्यालय असतं आणि ते ज्या पद्धतीनं काम करतं त्याच पद्तीनं हे कार्यालय स्थानिक पातळीवर काम करणार असल्याचं सांगितलं जातंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईती उत्तर प्रदेश सरकारचं कार्यालय कश्याप्रकारे काम करणार ?

मुंबईमध्ये असंघटीत क्षेत्रात काम करणा-या उत्तर भारतीयांची संख्या खुप मोठी आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये याच असंघटीत कामगारांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्णाण झाला होता. या प्रस्तावित कार्यालयातून मुंबईत राहणा-या उत्तर भारतीयांना उत्तर प्रदेशातील विविध क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत माहीती देण्यात येईल. यामध्ये पर्यटन, लघू उद्योग, मध्यम उद्योग या आणि अनेक गुतवणुकींचा समावेश असेल. या लोकांनी तयार केलेल्या मालाला उत्तर प्रदेशात आणि देशातील इतर भागांमध्ये बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल. उत्तर प्रदेशच्या या कार्यलयाच्या माध्यामातून इथे राहणा-या उत्तर प्रेदेशातील लोकांचा उत्तर प्रदेश सरकारसोबत समन्वय वाढण्यास मदत होईल. मुंबईत राहणा-या उत्तर भारतींना काही सरकारी अडचणी आल्यास हेच कार्यालय महाराष्ट्र सरकारशी समन्वय साधेल.

मुंबईमध्ये मोठय्या प्रमाणात उत्तर प्रदेश आणि बिहारी नागरीक राहतात. मुंबईत अनेक वेळा उत्तर भारतीय आणि मुळ मराठी माणुस हा वाद शिगेला पोचला होता. या वादात महत्वाची भूमिका होती ती म्हणजे शिवसेना आणि मनसे या पक्षांची. महाराष्ट्रात शिवसेना आता मुख्य़ सत्ताधारी पक्ष आहे. आणि महत्वाचं म्हणजे मोठी उत्तर भारतीय व्होट बॅंक असणारा कॉंग्रेस या पक्षासोबत शिवसेनेची आघाडी आहे. त्यामुळे सत्तेचा समतोल राखण्यासाठी यावर शिवसेना नक्की काय भूमिका घेते हे पाहणं महत्याचं असणार आहे. तर दुस-या बाजुला आता मनसेनं हिंदुत्वाच्या भूमिकेचा स्विकार केला आहे. पडद्यामागो भाजपासोबत मनसेचं मनोमिलनं झालं आहे. त्यामुळे आता मुळ भुमिकेवर ठाम रहायचं की नव्या राजकीय समिकरणांसाठी मुळ भूमिकेला बगल द्यायची ही वैचीरीक कसरत मनसेला करावी लागणार आहे. त्यातच मुंबईत येणा-या काळात महानगर पालिका निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे. अशयावेळी मुंबईत शिवसेनेला शह देऊन भाजपाला मुंबई महानगर पालिका काबीज करायची असेल उत्तर भारतीय मतांची साथ महत्वाची असणार आहे. त्यामुळे मुंबईत कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेऊन भाजपा एका बाणात अनेक पक्षी मारतेय की काय असा प्रश्न राजकीय वर्तूळात विचारला जातोय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up goverment will start office in mumbai pkd
First published on: 10-05-2022 at 12:21 IST