यूपीतील योगी आदित्यनाथ सरकारसमोर त्यांच्याच एका महिला मंत्र्यांने अडचणीत भर टाकली आहे. महिला कल्याण राज्यमंत्री स्वाती सिंह यांनी लखनऊमध्ये ‘बी द बिअर’ या बिअर बारचे उद्घाटन केले. हा बिअर बार लखनऊमधील गोमतीनगरसारख्या उच्चभ्रू परिसरात आहे. सोशल मीडियावर या बिअर बारच्या उद्घाटनप्रसंगी फीत कापतानाचे स्वाती सिंह यांचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. त्यानंतर स्वाती सिंह यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. स्वाती सिंह यांनी या बिअर बारचे उद्घाटन २० मे रोजी केले होते. पण त्याची छायाचित्रे आत्ता समोर आली आहेत.

स्वाती सिंह यांच्या मैत्रिणीचे हे बिअर बार आहे. या छायाचित्रात बाराबंकीचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह आणि उन्नावच्या पोलीस अधीक्षक नेहा पांडेही दिसत आहेत. गौरव सिंह आणि नेहा पांडे हे पती-पत्नी आहेत. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर स्वाती सिंह यांच्यावर मोठ्याप्रमाणात टीका होत आहे. यामध्ये भाजप समर्थकांचाही समावेश आहे.

Dudhganga tap water scheme,
इचलकरंजीची दूधगंगा नळपाणी योजना रखडल्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर राजू शेट्टी यांचे टीकास्त्र
cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”
vijay shivtare
निनावी पत्राद्वारे शिवतारेंच्या माघारीवर टीका; पवारांच्या विरोधातील ५ लाख ८० हजार मतदारांनी करायचे काय?

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये दारूविरोधात आंदोलने सुरू झाली होती. याचे नेतृत्व महिलांनीच केले होते. आता महिला मंत्रीनेच बिअर बारचे उद्घाटन केल्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत.

स्वाती सिंह या भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षही आहेत. भाजपचे वादग्रस्त नेते दयाशंकर सिह हे त्यांचे पती आहेत. त्यांनी बसपच्या नेत्या मायावती यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावेळी स्वाती सिंहही चर्चेत आल्या होत्या. बसप कार्यकर्त्यांनी दयाशंकर व त्यांच्या पत्नी स्वाती सिंह यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली होती.