Minnesota lawmaker husband assassinated : अमेरिकेतली मिनेसोटा येथे दोन संसद सदस्यांना त्यांच्या घरात घुसून गोळ्या घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वॉल्झ यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदार मेलिसा हॉर्टमन, माजी हाऊस स्पीकर आणि त्यांचे पती मार्क हे त्यांच्या ब्रुकलीन पार्क येथील घरात झालेल्या गोळीबारात ठार झाल्याची माहिती दिली आहे.

तर दुसरे एक स्टेट सिनेटर जॉन हॉफमन आणि त्यांची पत्नी यांच्यावर देखील त्यांच्या चॅम्पलिन येथील घरात गोळीबार करण्यात आला, त्यांना अनेक गोळ्या घालण्यात आल्या आहेत. पण ते या हल्ल्यातून बचावले असल्याचे सांगितले जात आहे. ही गोळीबाराची घटना राजकीयदृष्ट्या प्रेरित हत्या असल्याचे दिसून येत असल्याचे गव्हर्नर वॉल्झ म्हणले आहेत.

मिनियापोलिस या महानगर परिसरातील चॅम्पलिन आणि ब्रुकलून पार्क दोन शहरांमध्ये ही घटना घडली आहे.

मिनेसोटाचे गव्हर्नर टीम वाल्झ यांनी एक्सवर पोस्ट करत त्यांना या गोळीबाराबद्दल माहिती देण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी या घटनेनंतर स्टेट एमर्जन्सी ऑपरेशन सेंटर सुरू करण्यात आले असून आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत असेही म्हटले आहे.

ब्रुकलिन पार्क पोलीस विभागाने एडिनबर्ग गोल्फ कोर्सभोवती तीन मैलांच्या परीघात ‘शेल्टर-इन-प्लेस’ आदेश जारी केला आहे. स्थानिक आऊटलेट फॉक्स ९ ने दिलेल्या वृत्तानिसार, रहिवाशांना दोन गणवेशातील अधिकारी असल्याशिवाय घराचे दरवाजे उघडू नयेत असा सल्ला देण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान हॉफमन आणि हॉर्टमन हे दोघेही स्टेट डेमोक्रॅटिकशी संबंधित डेमोक्रॅटिक-फार्मर-लेबर पार्टीचे सदस्य आहेत. स्थानिक माध्यमानी ही घटना शनिवारी पहाटे घडल्याचे म्हटले आहे. मात्र सध्यातरी हा गोळीबार करणाऱ्या व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच या हल्ल्यामागील उद्देश अद्याप स्पष्ट होऊ शकलेला नाही. राजकीय हेतून प्रेरित होता का याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.