अमेरिकेतील एका कंपनीला कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढणे चांगलेच महागात पडले आहे. फ्लोरिडातील ‘चेतू’ या टेलिमार्केटींग कंपनीने ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या आपल्या एका कर्मचाऱ्याला वेबकॅम सुरू ठेवत नसल्याच्या कारणावरुन नोकरीवरून काढून टाकले. कंपनीला या निर्णयामुळे तब्बल ६० लाखांचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे.

BYJU’S To Lay Off Employees: ‘बायजू’ अडीच हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार, नेमकं कारण काय जाणून घ्या..

गोपनीयतेच्या अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा निर्वाळा देत नेदरलँड्सचा रहिवाशी असलेल्या कर्मचाऱ्याला ६० लाख देण्याचे आदेश येथील न्यायालयाने दिले आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला ‘चेतू’ कंपनीने दिवसातील नऊ तास वेबकॅम सुरू ठेवण्यास सांगितले होते. ही कंपनी वापरत असलेल्या एका प्रोग्राममुळे वापरकर्त्याला लॅपटॉपची स्क्रीन आणि लाईव्ह व्हिडीओ शेअर करणे अनिवार्य होते. त्यामुळे कंपनीचा हा आदेश योग्य नसल्याचे कर्मचाऱ्याला वाटत होते.

Work From Home मुळे वजन वाढलंय? वाचा ऑफिसमध्ये वजन कमी करण्यासाठी सोपे व्यायाम

या आदेशामुळे कंपनी आपल्या खाजगी आयुष्यावर अतिक्रमण करत असल्याची भावना कर्मचाऱ्यामध्ये बळावली होती. हा आदेश मानण्यास नकार दिल्यानंतर कंपनीने खोटे आरोप करत या कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढून टाकले. या विरोधात कर्मचाऱ्याने डच न्यायालयात धाव घेतली होती. घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेबकॅम सुरू ठेवण्यास सांगणे मानवाधिकारांचे उल्लंघन असल्याचे सांगत न्यायालयाने कंपनीवर ७२ हजार ७०० डॉलर्स म्हणजेच ६० लाखांचा दंड ठोठावला.

20 हजार पदांच्या सरकारी नोकऱ्या कशा मिळवाल? मनसेने प्रकाशित केली पुस्तिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘चेतू’ या कंपनीप्रमाणेच अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर करत आहे. Digital.com ने दिलेल्या अहवालानुसार ६० टक्के कंपन्या कर्मचाऱ्यांच्या हालचाली आणि उत्पादकतेवर अशा सॉफ्टवेअर्सद्वारे लक्ष ठेवून आहेत.