बॉलिवूड अभिनेते, दिग्दर्शक तारिक शाह यांचे आज ३ एप्रिल रोजी निधन झाले आहे. मुंबईमधील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या दोन वर्षांपासून तारिक हे किडनीशी संबंधित आजाराशी झुंज देत होते. आज उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी शोमा आनंद आणि मुलगी सारा असा परिवार आहे.
View this post on Instagram
तारिक यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘यादोंकी बारात’, ‘जखमी’, ‘गुमनाम है कोई’, ‘मुंबई सेंट्रल’ या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. ‘जन्म कुंडली’, ‘बहार आने तक’ या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. तारिक यांच्या पत्नी शोमा या देखील एक अभिनेत्री आहेत. त्यांनी ‘घर एक मंदिर’, ‘जुदाइ’, ‘कुली’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ‘हम पांच’, ‘शरारत’, ‘मायका’,’भाभी’ या काही मालिकांमध्ये काम केले आहे.