सीआयएने विश्व हिंदू परिषदेला धार्मिक दहशतवादी संघटना ठरवल्याने संतप्त झालेल्या विहिंपने सीआयए विरोधात जगभरात निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. सीआयएने दहशतवादी संघटनेच्या यादीतून विहिंपला वगळले नाही तर जगभरात सीआयए विरोधात निदर्शने होतील असे विहिंपने म्हटले आहे. सीआयए ही अमेरिकन गुप्तचर यंत्रणा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमची संघटना राष्ट्रवादी असून आम्ही देशाच्या हितासाठी, भल्यासाठी काम करतो. सीआयएने केलेले आरोप चुकीचे आणि तथ्यहीन आहेत असे विहिंपने म्हटले आहे. सीआयएनमे ओसामा बिन लादेनची निर्मिती केली त्यामुळे त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असे विहिंपने म्हटले आहे.

सीआएयने माफी मागून आपली चूक सुधारावी असे विहिंप नेते सुरेंद्र जैन यांनी म्हटले आहे. सरकारने हा विषय ट्रम्प प्रशासनाकडे मांडावा असेही त्यांनी म्हटले आहे. RSS अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना राष्ट्रवादी असल्याचे निरीक्षण अमेरिकेच्या CIA या गुप्तचर संस्थेने नोंदवले आहे. तर त्यांच्या फॅक्टबुकमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या दोन संघटनांचा उल्लेख ‘धार्मिक दहशतवादी समूह’ असा केला आहे.

राजकीय दबाव टाकणाऱ्या संघटनांच्या यादीत सीआयने या बजरंग दल आणि विहिंपचे नाव समाविष्ट केले आहे. बजरंग दलाने अमेरिकेच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. सीआयएने काश्मीरच्या हुर्रियत कॉन्फरन्सला कट्टरतावादी संघटना असल्याचे नमूद केले आहे. तर जमीयत उलेमा-ए-हिंद ही धार्मिक संघटना असल्याचे सीआयएने फॅक्ट बुकमध्ये म्हटले आहे

सीआयएने घेतलेल्या या निर्णयावर बजरंग दलाने टीका केली आहे. आमच्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याचा पर्याय खुला आहे. सीआयएच्या फॅक्टबुकविरोधात कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही कायदेशीर सल्लामसलत करतो आहोत असे बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक मनोज वर्मा यांनी म्हटले आहे.

 

 

 

More Stories onआरएसएसRSS
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vhp warns cia militant organisation rss
First published on: 15-06-2018 at 16:14 IST