काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अलीकडेच मध्यप्रदेशात ‘भारत जोडो’ यात्रेच्या कार्यक्रमातून भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला होता. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तुमच्या कुत्र्याने तरी बलिदान दिलं होतं का? असा सवाल खरगे यांनी विचारला. खरगे यांच्या या विधानावरून आज राज्यसभेत गदारोळ झाला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांना शांत करण्यासाठी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना आपल्या आसनावरून उठून उभं राहावं लागलं.

राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सभागृहात सांगितले, “आपण एक अतिशय वाईट उदाहरण देशासमोर मांडत आहोत. येथील लोकांचा भ्रमनिरास होत आहे. अशा प्रकारच्या वागण्यामुळे आपली खूप बदनामी होतं आहे.”

हेही वाचा- “मैं नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान…”, ‘भारत जोडो’ यात्रेबाबत राहुल गांधींचं विधान

जगदीप धनखड यांनी आपल्या आसनावरून उठून सत्ताधारी आणि विरोधकांच्या बाकांकडे बोट करत म्हणाले, ” अध्यक्षांच्या आसनावरून जे बोललं जात आहे, त्याकडेही तुम्ही लोकं गांभीर्याने लक्ष देत नाहीत. सभागृहातील वातावरण किती वेदनादायक झाले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा देशातील १३५ कोटी लोक आपल्यावर हसत आहेत. आपण कोणत्या स्तरापर्यंत खाली घसरलो आहोत.”

हेही वाचा- माफीवरून खरगे यांनी भाजपला सुनावले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं काय घडलं?

‘भारत जोडो’ यात्रेतील काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या विधानावरून राज्यसभेत मंगळवारी शून्य प्रहरात रणकंदन माजले. खरगेंनी सभागृहाचा, देशाचा, मतदारांचा अपमान केला असून त्यांनी तातडीने माफी मागितली पाहिजे, अशी जोरदार मागणी करत सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी काँग्रेसवर शाब्दिक हल्लाबोल केला. पण, ‘स्वातंत्र्य लढ्याच्या काळात माफी मागणारे आम्हाला माफी मागायला सांगत आहेत’, असे तितकेच आक्रमक प्रत्युत्तर खरगेंनी दिले. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या सदस्यांमध्ये बाचाबाची झाली.