काही लोक विदेशात जाऊन भारताची प्रतिमा मलिन करतात, अशी अप्रत्यक्ष टीका उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे. तसेच हा एक षडयंत्राचा भाग असून माध्यमांनी हे षडयंत्र उजेडात आणावं, असे ते म्हणाले. न्यूज १८ नेटवर्कच्या ‘रायजिंग इंडिया’ या कार्यक्रमात बोलतान त्यांनी हे विधानं केलं.
हेही वाचा – “प्रभू रामचंद्रांचा विचार घेऊनच…”, रामनवमीनिमित्त काँग्रेसकडून राहुल गांधींचा खास VIDEO शेअर
नेमकं काय म्हणाले उपराष्ट्रपती जगदीप धनखड?
काही लोक विदेशात जाऊन देशविरोधी भाषण करतात आणि परत येतात. जगात असा प्रकार कुठंही बघायला मिळत नाही. यावर सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. आपल्या देशाचा विकास रोखण्यासाठी संपूर्ण यंत्रणा काम करते आहे. हा एक षडयंत्राचा भाग आहे. हे षडयंत्र माध्यमांशी उजेडात आणायला हवं, अशी अप्रत्यक्ष टीका उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राहुल गांधी यांच्यावर केली. तसेच भारतातील लोकशाही आणि येथील संस्थावर टीका करणं हा आपल्यापैकी काही लोकांचा आवडता छंद आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा – “राहुल गांधी हे काँग्रेस पक्षासाठी ‘राहु’सारखे” शिवराज सिंह चौहान यांचा टोला
उपराष्ट्रपतींच्या हस्ते ‘वाइस ऑफ इंडिया’ पुस्तकाचं प्रकाशन
दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमावर आधारीत ‘वाइस ऑफ इंडिया’ पुस्तकाचं प्रकाशनही उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आलं. यासंदर्भातही जगदीप धनखड यांनी भाष्य केलं. पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाला मोठं यश मिळालं आहे. हा कार्यक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.