GST Rate Cut : केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेत जीएसटीत कपात करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यामुळे दैनंदिन वापरातील अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. आजपासून (२२ सप्टेंबर) तब्बल ३७५ वस्तूंवरील जीएसटी कपातीचा निर्णय लागू झाला आहे. यामध्ये स्वयंपाकघरातील अनेक वस्तूं, औषधांसह ऑटोमोबाईल्समधील काही वस्तू स्वस्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जीएसटी कपातीच्या निर्णयामुळे आजपासून नेमकं काय स्वस्त होणार? याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
दरम्यान, आजपासून कार, बाईक, टीव्हीसह अनेक घरगुती वस्तू स्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे मध्यमवर्गाला दिलासा मिळणार आहे. तसेच रोटी, पराठा, पनीर यासारखे अनेक अन्नपदार्थांना शून्य कर श्रेणीत टाकण्यात आलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलेल्या निर्णयांमध्ये जीएसटीचे दोन मुख्य स्लॅब करण्यात आले आहेत. त्यामध्ये ५ टक्के आणि १८ टक्के बहुतेक वस्तूंवर कर दरात कपात झाली आहे. या संदर्भातील वृत्त फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिलं आहे.
आजपासून काय स्वस्त होणार?
पनीर, केचप, जाम, पिझ्झा ब्रेड, सुकामेवा, खाखरा, रोटी, कॉफी, आईस्क्रीम, टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन या सारख्या वस्तू स्वस्त होतील. तसेच याआधी १२ टक्के कर आकारण्यात येणारी औषधे आता ५ टक्क्यांच्या श्रेणीत येतील. तसेच कर्करोग, अनुवांशिक विकार, दुर्मिळ आजार आणि हृदयरोगांसाठी आवश्यक असलेली ३६ औषधे आता पूर्णपणे करमुक्त होतील.
यामध्ये अॅगाल्सिडेस बीटा, इमिग्लुसेरेस, एप्टाकॉग अल्फा अॅक्टिव्हेटेड रीकॉम्बीनंट कोग्युलेशन फॅक्टर वीला, ओनासेम्नोजीन अबेपारव्होव्हेक, एस्किमिनिब, मेपोलिझुमॅब, पेजिलेटेड लिपोसोमल इरिनोटेकन, डाराटुमुमॅब, टेक्लिस्टामाब, अमिवंतामॅब, अॅलेक्टीनिब, रिसडिप्लाम, ओबिनुतुझुमॅब, पोलाटुझुमॅब वेडोटिन, एन्ट्रेक्टीनिब, एटेझोलिझुमॅब, स्पेसोलिमाब, वेलाग्लुसेरेस अल्फा, अॅगाल्सिडेस अल्फा, रुरिओक्टोकॉग अल्फा पेगोल, इडर्सल्फेस, अल्ग्लुकोसिडेस अल्फा, लॅरोनिडेस, ओलिपुडेस अल्फा, टेपोटिनिब, अॅव्हेलुमॅब, एमिझिझुमॅब, बेलुमोसुडिल, मिग्लुस्टॅट, वेलमनेस अल्फा, अॅलिरोक्युमॅब, इव्होलोक्युमॅब, सिस्टामाइन बिटार्ट्रेट, सीआय-इनहिबिटर इंजेक्शन आणि इन्क्लिसिरन या औषधांचा समावेश आहे.
तसेच पेन्सिल शार्पनर, इरेजर, अनकोटेड पेपर, पेपरबोर्ड, ग्राफ बूक, एक्सरसाइज बूक, नोटबूक या वस्तू देखील आता शून्य टक्क्यांच्या जीएसटीच्या श्रेणीत आल्या आहेत. तसेच नकाशे, भिंतींचे नकाशे, अॅटलेस आणि ग्लोब्स देखील शून्य जीएसटीत येतील.
५ टक्के जीएसटीत कोणत्या वस्तू येणार? वाचा संपूर्ण यादी!
आजपासून विविध उत्पादने ५ टक्के जीएसटी श्रेणीत येतील. सरकारच्या नवीन कर सुधारणांमध्ये आवश्यक अन्नपदार्थ, औषधे, वैद्यकीय उपकरणे, पॅकेज केलेले पेये, लाकडी वस्तू, चामड्याच्या वस्तू आणि अगदी काही हस्तकलेच्या संदर्भातील वस्तुंचा समावेश आहे. या निर्णयामुळे मध्यमवर्गाला दिलासा मिळेल.
५ टक्के जीएसटीत कोणत्या वस्तू? :
दुग्धजन्य पदार्थ : तूप, लोणी, चीज. त्याचबरोबर बदाम, पिस्ता, काजू आणि खजूर, अंजीर, पेरू, आंबा, अननस.
वैद्यकीय : ऑक्सिजन, आयोडीन, भूल देण्याच्या संदर्भातील वस्तू, हायड्रोजन पेरॉक्साइड (वैद्यकीय), सल्फ्यूरिक आम्ल, नायट्रिक आम्ल.
जीवनरक्षक औषधे : डायग्नोस्टिक किट, अभिकर्मक, सर्जिकल हातमोजे, पट्ट्या, वॅडिंग. आरोग्य आणि वैयक्तिक काळजी घेण्याच्या वस्तू, टॅल्कम पावडर, केसांचे तेल, साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, शेव्हिंग क्रीम, आफ्टरशेव्ह लोशन, डेंटल फ्लॉस.
बाळांसाठीचे उत्पादने : फीडिंग बॉटल, निपल्स, प्लास्टिक मणी.
पॅक केलेले अन्न : पास्ता, नूडल्स, बिस्किटे, केक, पेस्ट्री, नमकीन, भुजिया, सॉस, सूप, जाम, आईस्क्रीम, चॉकलेट, साखर मिठाई.
पेये : पॅकेज केलेले नारळ पाणी, फळांचे रस, चहा आणि कॉफीचे अर्क, वनस्पती-आधारित पेये
समुद्री अन्न : संरक्षित किंवा प्रक्रिया केलेले मासे, क्रस्टेशियन्स, मोलस्क
लाकडी वस्तू : फर्निचर वस्तू, मूर्ती, हस्तकला, स्वयंपाकघरातील वस्तू, बांबूच्या वस्तू, सजावटीचे उत्पादने, हँडबॅग्ज, पर्स, हातमोजे आणि चामड्याचे बोर्ड यासारख्या चामड्याच्या वस्तू.
कलाकृती उत्पादने : हस्तनिर्मित कागद, कार्टन, नालीदार बॉक्स, बायोडिग्रेडेबल कागदी पिशव्या, रबर बँड, बिडी रॅपर पाने.
फिटनेस आणि वेलनेस : जिम उपकरणे, वेलनेस सेंटर, योग सेवा.
आजपासून १८ टक्के जीएसटीत येणाऱ्या वस्तू कोणत्या?
-कोळसा, ब्रिकेट, कोळशापासून बनवलेले इतर घन इंधन. पोर्टलँड सिमेंट, अॅल्युमिनियम सिमेंट, स्लॅग सिमेंट, सुपर सल्फेट सिमेंट आणि तत्सम हायड्रॉलिक सिमेंट. ब्रिकेट, ओव्हॉइड्स आणि तत्सम कोळशापासून बनवलेले घन इंधन. गंध तयार करणारे पदार्थ जे जाळून काम करतात (अगरबत्ती, लोभान, धूप बत्ती, धूप, वगळून)
-बायोडिझेल (हाय-स्पीड डिझेलमध्ये मिसळण्यासाठी तेल विपणन कंपन्यांना पुरवलेले बायोडिझेल वगळून)
-नवीन वायवीय रबर टायर (सायकल, सायकल-रिक्षा, तीन-चाकी चालणारे सायकल रिक्षा टायर, ट्रॅक्टर टायर आणि विमान टायर वगळून)
-रासायनिक लाकडाचा लगदा (विरघळणारे ग्रेड) लेखन, छपाई किंवा ग्राफिक उद्देशांसाठी वापरले जाणारे अनकोटेड पेपर आणि पेपरबोर्ड (पुस्तके, ग्राफ पुस्तके, लॅब नोटबुक आणि नोटबुकसाठी कागद वगळता)
–पोशाख आणि कपड्यांचे सामान : (विणलेले किंवा क्रोशे केलेले) ज्याची विक्री किंमत प्रति तुकडा ₹२५०० पेक्षा जास्त आहे. प्रति तुकडा ₹२५०० पेक्षा जास्त आहे अशा बनवलेल्या कापडाच्या वस्तू आणि सेट (जीर्ण कपडे, चिंध्या आणि जुन्या वस्तू वगळून)
-स्पार्क-इग्निशन रेसिप्रोकेटिंग किंवा रोटरी इंटरनल कम्बशन पिस्टन इंजिन (विमान इंजिन वगळून), कंप्रेशन-इग्निशन (डिझेल/सेमी-डिझेल) इंटरनल कम्बशन पिस्टन इंजिन, इंजिन वरील इंजिनांसह वापरण्यासाठी योग्य असलेले भाग, इंधन वितरण पंप, वंगण पंप किंवा अंतर्गत ज्वलन इंजिनसाठी शीतकरण माध्यम पंप.
कोणत्या वस्तू महागणार?
-गुटखा, तंबाखू, सिगारेट, पान मसाला या वस्तू आता महागणार असून यावर २८ टक्क्यांवरून ४० टक्के जीएसटी लागणार आहे.
-२५०० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कपडे १२ टक्क्यांवरून १८टक्के जीएसटी लागणार
-१२०० सीसी किंवा १५०० सीसीपेक्षा जास्त इंजिन असलेल्या एसयूव्हीकारवर ४० टक्के जीएसटी लागणार.
-३५० सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या बाईक, खाजगी विमाने, रिव्हॉल्व्हर ४० टक्के जीएसटी लागणार.
नवीन जीएसटी दरांनुसार टीव्हीच्या किमती कमी होणार
जीएसटी दरकपातीमुळे टीव्हीच्या किमतींमध्ये ८५ हजार रुपयांपर्यंत घट होईल. ३२ इंचांपेक्षा मोठी स्क्रीन असलेल्या टीव्हीवर पूर्वी २८ टक्के जीएसटी आकारला जात होता. आता या टीव्हीवर १८ टक्के जीएसटी आकारला जाईल. त्यामुळे या टीव्हीच्या किमतीत २,५०० रुपये ते ८५,००० रुपयांपर्यंतची घट होईल.
टीव्हीच्या किमतींमध्ये झालेली घट (ब्रॅण्डनुसार)
सोनी इंडिया – ५,००० रुपये ते ७१,००० रुपये
एलजी – २,५०० रुपये ते ८५,८०० रुपये.
पॅनासॉनिक – ३,००० रुपये ते ३२,००० रुपये.
एसीच्या किमतीही आजपासून कमी होतील. कारण एसीवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे.
एसीच्या किमतींमध्ये झालेली घट (ब्रॅण्डनुसार)
गोदरेज अप्लायन्स : ८,५५० रुपये ते १२,५०० रुपये.
हायर : ३,९०५ रुपये ते ४६,०८५ रुपये.
एलजी : १ टन थ्री स्टार एसीची किमत २,८०० रुपयाने कमी होणार आहे.
रेफ्रिजरेटर व डिशवॉशर किती स्वस्त होणार?
गोदरेज : रेफ्रिजरेटरच्या किमतीत ७% ते ८% कपात.
एलजी : रेफ्रिजरेटरच्या किमतीत ८% ते ९% पर्यंत कपात.
डिशवॉशरच्या किमतीत ८,००० रुपयांपर्यंत कपात होईल.
