WhatsApp, Facebook Messenger Down : सोशल मॅसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक मेसेंजर आज (शुक्रवार) जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी डाऊन झाल्याची प्रकार समोर आला आहे. अनेक वापरकर्त्यांना अ‍ॅपवरून मेसेज पाठवण्यास अडचण येत असल्याने त्यांनी डाऊन डिटेक्टरवर याबद्दल तक्रार केली आहे. जगभरातील अनेत ठिकाणी वापरकर्त्यांना या अडचणीचा सामना करावा लागला. फक्त स्मार्टफोन्सच नाही तर वापरकर्त्यांना संगणक आणि लॅपटॉपवर देखील हे अ‍ॅप वापरण्यात अडचणीचा सामना करावा लागत आहे.

ऑनलाइन आउटेज बद्दल अपडेट देणाऱ्या डाउनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, बातमी लिहिण्यापर्यंत अमेरिकेत व्हॉट्सअ‍ॅपबद्दल ४००० हून अधिक आणि भारतात १०००० हून अधिक वापरकर्त्यांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. मेटाने मात्र अद्याप या समस्येबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर अमेरिकेत १ हजार वापरकर्त्यानी फेसबुक मेसेंजर वापरतानाही अडचण येत असल्याचे म्हटले आहे.

युकेमध्ये हजारो व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना समस्या

यूकेमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरताना अडचण येत असल्याच्या ७५०० हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. डाउनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार लंडन, मँचेस्टर आणि ग्लासगो या ठिकाणांना या समस्येचा सर्वाधिक फटका बसला आहे. ज्यांना या अडचणींचा सामना करावा लागला त्यापैकी ५९ टक्के लोकांनी सांगितले की ते संदेश पाठवू शकत नव्हते. तर दुसर्‍या २२ टक्के लोकांनी सर्व्हर कनेक्शनमध्ये अडचण येत असल्याचे तर उरलेल्या १९ टक्के लोकांनी अ‍ॅप वापरताना अडचण येत असल्याचे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या वर्षीही झाला होता असाच प्रकार

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मेटाचे फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप यासह इतर अनेक अ‍ॅप्लिकेशन्स डाऊन झाल्याचा प्रकार घला होता. याचा फटका जगभरातील लाखो वापरकर्त्यांना बसला होता. तेव्हा वापरकर्त्यांनी लोड होण्यास वेळ लागणे, कमेंट करताना अडचण येणे आणि अ‍ॅप उघडताच न येणे अशा समस्यांचा सामना करावा लागला होता. या प्रकारानंतर मेटाने वापरकर्त्यांची माफी मागितली होती. यावेळी डाऊनडिटेक्टर.कॉमवर फेसबुकबद्दल १०५००० हून अधिक तक्रारी करण्यात आल्या होत्या. तर इंस्टाग्रामशी संबंधित ७० ००० आणि व्हॉट्सअॅपशी संबंधित १२ ००० हून अधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या.