मोठी बातमी! Pfizer-BioNTech लसीच्या आपत्कालिन वापराला WHO कडून मंजुरी

जागतिक आरोग्य संघटनेकडून पहिल्यांदाच लसीच्या वापरासाठी परवानगी

संग्रहित

जागतिक आरोग्य संघटनेने फायजर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या आपत्कालिन वापरासाठी गुरुवारी परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटनने ८ डिसेंबरला लसीच्या वापरासाठी सर्वात आधी परवानगी दिली होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि युरोपिअन युनिअन देशांनीही लसीच्या आपत्कालिन वापराला परवानगी दिली होती.

करोना व्हायरसचा फैलाव सुरु झाल्यापासून आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळालेली फायजर-बायोटेक ही पहिलीच करोना प्रतिबंधक लस असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. “संपूर्ण जगाला करोना लस उपलब्ध व्हावी यादृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल आहे,” असं जागतिक आरोग्य संघटनेचे मॅरिएंगेला सिमाओ यांनी म्हटलं आहे. मॅरिएंगेला सिमाओ यांच्यावर औषधं उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आहे.

“प्राथमिकता असणार्‍या लोकसंख्येपर्यंत लस पोहोचावी यासाठी आणखी मोठ्या प्रमाणात जागतिक प्रयत्नाची गरज आहे यावर मी भर देऊ इच्छिते,” असं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. आपत्कालिन वापरासाठी परवानगी देण्यात आल्याने अनेक देशांमधील नियामक प्रशासनाला करोना लसीच्या आयात आणि वितरणाला परवानगी देण्याचा मार्ग मोकळा होत असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने आपले तज्ज्ञ तसंच जगभरातील इतर तज्ज्ञांनाही फायजर-बायोटेकच्या सुरक्षा, दर्जा तसंच इतर गोष्टींची पडताळणी करण्यास सांगितलं होतं. यादरम्यान फायजर-बायोटेकची लस सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या निकषावर योग्य असल्याचं समोर आलं. तसंच करोनामुळे निर्माण होणारे धोके लसीमुळे दूर होत असल्याचंही सांगण्यात आलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Who grants emergency validation to pfizer covid vaccine sgy

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या