Delhi-Mumbai Expressway Manoharlal Dhakad Viral Video : मध्य प्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यातून जाणाऱ्या दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खुलेआम शारीरिक संबंध बनवणाऱ्या माजी भाजपा नेत्याचा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या मनोहरलाल धाकड यांना पोलिसांनी रविवारी (२५ मे) अटक केली आहे. तसेच, धाकड यांच्याबरोबर दिसणाऱ्या महिलेचा तपास चालू आहे. दरम्यान, ती महिला नेमकी कोण होती? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

धाकड यांच्याबरोबर भर रस्त्यात शरीरसंबंध ठेवण्यास ती महिला कशी काय तयार झाली? तिच्यावर जबरदस्ती झाली होती का? की ती स्वतःहून धाकड यांच्याबरोबर गेली होती? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसऱ्या बाजूला पोलिसांनी या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून तिचा शोध घेतला जात आहे. तसेच पोलिसांनी त्या महिलेची ओळख पटली असल्याचा दावा केला आहे.

ब्लॅकमेलिंगचं प्रकरण

व्हायरल झालेला व्हिडीओ १३ मे रोजीचा आहे. मात्र हा व्हिडीओ २२ मे रोजी सर्वांसमोर आला. यामध्ये ब्लॅकमेलिंगचं प्रकरण देखील समोर आलं असून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या कर्मचाऱ्यांनी धाकड यांना व्हिडीओच्या बदल्यात ब्लॅकमेल केल्याचा आरोप धाकड यांनी केला आहे. पोलिसांनी याबाबत माहिती देताना म्हटलं आहे की आवश्यकता भासल्यास या कर्मचाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल केला जाईल.

एका बाजूला, मनोहरलाल धाकड यांच्याबरोबर व्हिडीओत दिसणाऱ्या महिलेचा पोलिसांकडून शोध चालू असताना सोमवारी धाकड यांना न्यायालयाने जामीन दिला आहे. त्यांना रविवारी अटक केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ती महिला नेमकी कोण आहे?

काँग्रेसच्या एका नेत्याने दावा केला आहे की त्या व्हिडीओत दिसणारी महिला मंदसौर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षिका आहे. तिच्या बदलीसाठी ती मनोहरलाल धाकड यांच्या संपर्कात आली होती. धाकड यांची पत्नी पंचायत समितीची सदस्य आहे. सरकारी शाळा पंचायत समितीच्या अखत्यारित येते. त्यामुळे धाकड यांनी सदर शिक्षिकेला तिच्या बदलीचं किंवा राजकीय प्रलोभन दिलं असावं. त्यामुळे यामध्ये बलात्काराचं प्रकरणही समोर येऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेत्यांनी केली आहे.