सध्या संपूर्ण जग करोना व्हायरसमुळे त्रस्त आहे. जीव वाचवण्याबरोबरच गंभीर आर्थिक संकटही या आजाराने निर्माण केले आहे. या जीवघेण्या व्हायरसला रोखू शकणारी लस बनवण्यासाठी जगातील अनेक प्रमुख देशांमध्ये मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. पण या मध्ये मुख्य स्पर्धा ही अमेरिका आणि चीनमध्ये आहे. व्यापारापासून अनेक आघाडयांवर या दोन देशांमध्ये सध्या संघर्ष सुरु आहे. सुरुवातीला रशिया अमेरिकेचा स्पर्धक होता. पण आता ती जागा चीनने घेतली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९६१ साली जेव्हा रशियाने पहिला मानव यशस्वीरित्या अवकाशात पाठवला तेव्हा अमेरिकेला धक्का बसला होता. त्यानंतर अमेरिकेने आपल्या अवकाश संशोधनाला प्रचंड गती दिली व चंद्रावर पहिले मानवी पाऊल ठेवण्याचा मान मिळवला. सध्याच्या परिस्थितीत करोना व्हायरसविरोधात लस बनवण्यात चीनला यश मिळाले तर तो अमेरिकेच्या प्रतिष्ठेसाठी एकप्रकारचा धक्का असेल.

त्यामुळेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संशोधनाला गती देण्यावर भर दिला आहे. पुढच्या काही महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वर्षअखेरीस अमेरिकेकडे करोना व्हायरसची लस उपलब्ध असेल असे ट्रम्प सांगत आहेत. करोना संकटामुळे अमेरिकेत औषध कंपन्या, सरकारी संस्था आणि लष्कर एकत्र येऊन काम करत आहेत. व्यापारापासून ते ५ जी कम्युनिकेशनर्यंत दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत.

अमेरिकेमध्ये आघाडीच्या औषध कंपन्या या लस निर्मितीच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. तिथे क्लिनिकल चाचण्या सुरु झाल्या आहेत. यामध्ये चीन सुद्धा मागे नाही. चीनची लस संशोधनाची प्रक्रिया दुसऱ्या टप्प्यावर पोहोचली आहे. तियानजीनमधील एका कंपनीच्या मदतीने चीनमधील मेडिकल मिलिट्री सायन्स अ‍ॅकेडमी लस निर्मितीवर काम करत आहे. ५०८ स्वयंसेवक दुसऱ्या टप्प्यामध्ये सहभागी झाले आहेत. महिनाअखेरीस या चाचणीचे निष्कर्ष समजतील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who will win the race to make vaccine on corona virus america or china dmp
First published on: 08-05-2020 at 16:29 IST