आई-वडील त्यांच्या मुलाबरोबर क्रूरपणे वागल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत, पण आपल्याच पोटच्या मुलाला २७ वर्ष घरात डांबून ठेवल्याचा एक प्रकार समोर आला आहे. दक्षिण पोलंडमध्ये अशीच एक घटना समोर आली असून मिरेला नावाच्या एका महिलेला तिच्या पालकांनीच तब्बल २७ वर्ष कथितरित्या डांबून ठेवले होते. पोलिश माध्यमांनी यासंबंधीचे वृत्त दिले आहे. आता या ४२ वर्षीय महिलेसाठी तिचे शेजारी आणि हितचिंतक पैसे गोळा करत आहेत.
शेजाऱ्यांना या महिलेच्या पालकांच्या फ्लॅटमध्ये काहीतरी गोंधळ ऐकू आल्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला आणि यानंतर वॉर्सा येथून १८० मैल अंतरावरील Swietochlowice येथे हा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
मिरेला या महिलेला जुलै महिन्यात वाचवण्यात आले आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात तिची गोष्ट सगळीकडे पसरली. मिळालेल्या माहितीनुसार ही महिला १५ वर्षांची असताना तिच्या पालकांनी तिला बंद करून ठेलसे होते. तिच्या पालकांनी आजूबाजूच्या लोकांना ती हरवली असल्याचे सांगितले होते. लोकल आऊटलेट टीव्हीपी३ आणि सूपर एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
पोलिसांना ती अत्यंत कृश अवस्थेत आढळून आली, शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिची शारीरिक अवस्था अतिशय नाजूक असून ती एखाद्या वृद्ध महिलेसारखी दिसत होती, असे शेजाऱ्यांनी सांगितले.
पोलीस जेव्हा तपासणीसाठी आले तेव्हा मिरेला आणि तिची आई या सातत्याने कोणतीही समस्या नसल्याचे सांगत राहिल्या, पण अधिकाऱ्यांनी जोर देऊन तिला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी खुलासा केला की, संसर्ग आणि पायाच्या जखमांमुळे ती मृत्यूपासून काही दिवसांवर येऊन ठेपली होती.
मिरेलाला लाहनपणी पाहिलेल्या शेजाऱ्यांना तिच्याबरोबर झालेल्या हा विश्वासघात आणि अमानुष वागणुकीमुळे प्रचंड धक्का बसला आहे. इतके दिवस काळ डांबून ठेवल्यानंतर तिच्या प्रकृती सुधारणेसाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत.
पीपल मॅगझिनने दिलेल्या वृत्तानुसार, मिरेलाला जुलै महिन्यात सोडवण्यात आले, पण हे प्रकरण पोलंडमध्ये या महिन्यात चर्चेत आले आहे. मिरिलाच्या पालकांच्या फ्लॅटमध्ये गोंधळ ऐकलेल्या शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले, त्यानंतर पोलिसांनी मिरेलाला तिच्या घरात आढळून आली.
“फ्लॅटमधून वेगवेगळे आवाज येणे सुरू झाल्यानंतर या प्रकरणाला सुरूवात झाली. रात्री उशीरा आम्ही पोलिसांना फोन केला,” असे Luiza या शेजारी राहाणाऱ्या महिलेने सांगितले.
शेजाऱ्यांच्या मते मिरेलाच्या पालकांनी ती वयाच्या १५ व्या वर्षी म्हणजे २७ वर्षांपूर्वी बेपत्ता झाल्याचे सांगितले होते, असे वृत्त अनेक माध्यमांनी दिले आहे