Wrestlers Protest : भाजपाचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाटने एक कविता पोस्ट केली आहे. विनेश फोगाटने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या कवितेचा फोटो शेअर केला आहे. तसंच या ट्विटच्या कॅप्शनमध्ये तिने न्याय मिळावा म्हणून मागणी केली आहे.

विनेश फोगाटने शेअर केलेली कविता काय आहे?

सुनो द्रौपदी, शस्त्र उठा लो,
अब गोविंद ना आएंगे

छोडे मेहंदी, खड्ग संभालो
खुद ही अपना चीर बचा लो
द्यूत बिछाए बैठे शकुनी
मस्तक सब बिक जाएंगे
सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो,
अब गोविंद ना आएंगे

पुष्यमित्र उपाध्याय यांची ही कविता आहे. We Want Justice असं म्हणत विनेश फोगाटने ही पूर्ण कविता पोस्ट केली आहे.

हे पण वाचा “WFI चं अध्यक्षपद महिलेला द्या आणि…” आंदोलन करणाऱ्या कुस्तीगीरांनी सरकारसमोर ठेवल्या ‘या’ पाच मागण्या

दिल्ली पोलिसांनी १५ जून रोजी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील POCSO अंतर्गत आरोप रद्द करण्याची शिफारस केली आणि लैंगिक छळ केल्याच्या आरोपांवर आरोपपत्र दाखल केलं आहे. दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस कोर्टात अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक छळ प्रकरणासंदर्भात रद्द अहवाल दाखल केला आहे. ४ जुलै रोजी न्यायालय रद्द अहवालावर सुनावणी करणार आहे. तसेच, बृजभूषण शरण सिंह यांच्यावर सहा प्रौढ कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी पोलिसांनी राऊस अव्हेन्यू न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यासाठी न्यायालयाने २२ जूनची तारीख निश्चित केली असून त्यादिवशी सुनावणी पार पडेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे पण वाचा “…म्हणून बृजभूषणला अटक करणं गरजेचं”, विनेश फोगाटचं ट्वीट व्हायरल; म्हणाली, “पोलिसांनी आम्हाला…!”

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह शरण यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोपपत्र दाखल झाल्यावर आंदोलक कुस्तीपटू साक्षी मलिक हिने प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, या संपूर्ण प्रकरणावर आरोपपत्र दाखल होण्याची आम्ही वाट पाहत आहोत, त्यानंतरच आम्ही काहीही बोलू शकू. आता विनेश फोगाटने या सगळ्या परिस्थितीला सूचक अशी कविता पोस्ट केली आहे.