X Down : उद्योगपती एलॉन मस्क यांच्या मालकीच्या एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जगभरातील असंख्य युजर्सना आज एक्सचा वापर करण्यात अडथळे आल्याची माहिती समोर आली आहे. डाउन डिटेक्टर वेबसाइटनुसार, अनेक युजर्सना एक्सचा वापर करताना अडथळे आले आहेत. दरम्यान, सर्वात जास्त लोकप्रिय असणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सची सेवा (ट्विटर) काही प्रमाणात ठप्प झाल्यामुळे जगभरातील वापरकर्त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, एक्सची सेवा काही काळासाठी डाऊन झाली होती, त्यामुळे अनेकांना पोस्ट शेअर करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे एक्सवरील युजर्स हैराण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. एक्स वापरकर्त्यांना स्टोरी फीड आणि ट्विटही करता येत नव्हते. त्यामुळे अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भातील वृत्त टाईम्स नाऊने दिलं आहे.

भारतात विशेषतः एक्सच्या सेवेबाबत तक्रारींची संख्या शेकडोंमध्ये वाढली आहे. डाउन डिटेक्टरनुसार, सुमारे ७४ टक्के वापरकर्त्यांना एक्सच्या वेबच्या सेवेला अडचणी आल्या आहेत. तसेच २३ टक्के वापरकर्त्यांना मोबाइल अॅपद्वारे समस्या येत आल्या आहेत. तसेच आणखी ३ टक्के वापरकर्त्यांनी सर्व्हर कनेक्टिव्हिटीशी संबंधित समस्या नोंदवल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आतापर्यंत समोर आलेल्या वृत्तानुसार एक्सकडून अद्याप याबाबत कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही किंवा कोणतंही अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही. पण एक्स वापरकर्त्यांकडून तक्रारींचा पाऊस पडत आहे. भारतातील काही मोठ्या शहरात एक्स वापरताना संकेतस्थळ आणि अ‍ॅप अशा दोन्ही माध्यमांमध्ये समस्या येत आहेत. त्यामुळे याचा लाखो वापरकर्त्यांवर परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे. याबाबत अनेक वापरकर्त्यांनी कंटेंट पोस्ट करण्यासाठी त्रुटी नोंदवल्या आहेत.