Yasin Malik Claims About Atal Bihari Vajpayee, RSS and Shankaracharya: दहशतवादी आणि जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंट या बंदी घातलेल्या संघटनेचा नेता यासिन मलिकने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या सविस्तर प्रतिज्ञापत्रात अनेक दावे केले आहेत, ज्यात मोठ्या राजकीय व्यक्ती आणि धार्मिक नेत्यांशी त्याचा भूतकाळात आलेल्या संबंधांचा समावेश आहे.
एनडीटीव्हीने मिळवलेल्या प्रतिज्ञापत्रात, यासिन मलिकने दोन दशकांत विविध लोकांशी साधलेल्या संवादांचा इतिहास आहे. यात दोन शंकराचार्यांशी उच्चस्तरीय संवाद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नेत्यांशी व्यापक संपर्क, भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांशी बैठका आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या २०००-०१ च्या रमजान शस्त्रबंदीला पाठिंबा देण्यात त्याची कथित भूमिका यांचा उल्लेख आहे.
दरम्यान, हे सर्व यासिन मलिकने न्यायालयात दाखल केलेल दावे आहेत. त्याने उल्लेख केलेल्या कोणत्याही नेत्यांनी किंवा संघटनांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दोन शंकराचार्यांच्या भेटी
यासिन मलिकच्या मुख्य दाव्यांपैकी एक दावा असा आहे की, वेगवेगळ्या मठातील किमान दोन शंकराचार्य श्रीनगरमधील त्यांच्या निवासस्थानी “अनेक वेळा” आले होते आणि त्यांच्यासोबत पत्रकार परिषदही घेतली होती. दरम्यान, मलिकने या शंकराचार्यांची नावे किंवा या भेटींच्या तारखा स्पष्ट केल्या नाहीत.
आरएसएस नेतृत्वाशी संबंध
मलिकने २०११ मध्ये नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये आरएसएस नेत्यांसोबत झालेल्या पाच तासांच्या बैठकीचाही उल्लेख केला आहे. दिल्लीस्थित थिंक टँक सेंटर फॉर डायलॉग अँड रिकॉन्सिलिएशनने या बैठकीचे आयोजन केल्याचा त्याचा दावा आहे.
त्याने पुढे म्हटले आहे की, विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनचे तत्कालीन अध्यक्ष अॅडमिरल केके नायर यांनी त्याला त्यांच्या निवासस्थानी आणि इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये “दुपारच्या जेवणासाठी” अनेक वेळा आमंत्रित केले होते.
“माझ्यापासून अंतर ठेवण्याऐवजी आरएसएसचे नेतृत्व असो किंवा अगदी आरएसएस संघटनेच्या थिंक टँक विवेकानंद इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अॅडमिरल केके नायर मला वारंवार नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी आणि इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये जेवणासाठी आमंत्रित करायचे”, असा दावा मलिकने प्रतिज्ञापत्रात केला आहे.
वाजपेयींचा रमजान शस्त्रविराम
मलिकने या प्रतिज्ञापत्रात पुढे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २०००-०१ मध्ये एकतर्फी जाहीर केलेल्या शस्त्रविरामात त्याच्या भूमिकेचा उल्लेख केला आहे.
मलिक म्हणला की, तो दिल्लीत अजित डोवाल यांना भेटला होते, त्यांनी त्याची ओळख तत्कालीन आयबी संचालक श्यामल दत्ता आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांच्याशी करून दिली. मलिकाचा दावा आहे की, दोघांनीही त्याला सांगितले की, पंतप्रधान काश्मीर प्रश्न सोडवण्याबाबत गंभीर आहेत आणि त्यांनी या शस्त्रविरामास पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.