scorecardresearch

Premium

१४ मजली इमारती एवढा उंच आहे ‘हा’ राजा! जगातील सर्वोच्च गणपतीच्या मूर्तीची ‘ही’ झलक पाहून व्हाल मंत्रमुग्ध

World Tallest Ganpati Murti: आपण आजपर्यंत लालबागमध्ये अशा अनेक मोठमोठ्या उंच मूर्ती पहिल्या असतील. या मूर्ती पाहण्यासाठी मान वर करून बघताना “बापरे” असं अचानक तोंडून निघतं पण

14th Floor Building Height of World Tallest Ganpati Idol Video Take Darshan Here Did You Know These Unique Ganesh Murti
आपण आज जगातील सर्वात उंच गणरायाचे दर्शन घेणार आहोत. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

World Tallest Ganpati Idol: महाराष्ट्रासह जगभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईतील लालबाग ज्याला गणरायाची नगरी म्हणून ओळखले जाते तिथे प्रत्येक गल्लीत बाप्पाचे मनोहर रूप पाहायला मिळत आहे. ज्यांना शक्य आहे ते मोठमोठ्या रांगांमधून उभं राहून बाप्पाच्या दर्शनाला पोहोचले आहेत तर ज्यांना शक्य नाही त्यांना सुद्धा घरबसल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून गणरायाचे दर्शन घेता येत आहे. सोशल मीडियाच्या असंख्य फायद्यांपैकी हा एक सर्वात मोठा लाभ म्हणता येईल. याचा लाभातून आपण आज जगातील सर्वात उंच गणरायाचे दर्शन घेणार आहोत.

आपण आजपर्यंत लालबागमध्ये अशा अनेक मोठमोठ्या उंच मूर्ती पहिल्या असतील. या मूर्ती पाहण्यासाठी मान वर करून बघताना “बापरे” असं अचानक तोंडून निघतं पण ही जगातील सर्वात उंच गणेशमूर्ती २०- २२ नव्हे तर चक्क १२८ फुटी आहे. आता तुम्हीच विचार करा ही मूर्ती बघायला किती मान उंच करावी लागेल. प्राप्त माहितीनुसार, ही गणेशमूर्ती ३९ मीटर उंच असून यांची उंची तब्बल १४ मजली इमारतीइतकी आहे. २००८ मध्ये या मूर्तीची बांधणी सुरु झाली होती व २०१२ मध्ये हे काम पूर्ण झाले होते. संपूर्ण मूर्ती ही कांस्य (Bronze) धातूने बनवलेली आहे.

nashik eco friendly ganesh visarjan, nashik ganesh visarjan, nashik ganesh visarjan miravnuk, ganesh visarjan artificial lakes nashik
नाशिकमध्ये पर्यावरणस्नेही विसर्जनासाठी तयारी, कृत्रिम तलावांची व्यवस्था, पीओपी मूर्ती नदीपात्रात विसर्जित केल्यास कारवाई
More than 17,000 seven-day Ganpati idols immersed, five thousand idols immersed artificial lake mumbai
पहाटे सहा वाजेपर्यंत सात दिवसांच्या १७ हजाराहून अधिक गणेशमूर्तीचे विसर्जन; कृत्रिम तलावात पाच हजार मूर्ती विसर्जित
Nagpur marbat
नागपूरची प्रसिद्ध काळी, पिवळी मारबत कशी तयार होते? ३० फूट उंच, बांबू, खरडे आणि बरेच काही..
ganesh murti
वर्धा : मोफत माती घेवून स्वतः तयार केलेली गणेश मूर्ती बसवा… पर्यावरणप्रेमी महिलांचा उपक्रम

सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की ही गणेश मूर्ती चतुर्हस्त आहे. या मूर्तीच्या वरच्या उजव्या हातात फणस ,वरच्या डाव्या हातात ऊस, खालच्या उजव्या हातात केळी आणि खालच्या डाव्या हातात आंबा आहे.

हे ही वाचा<< ज्येष्ठा गौरीसाठी चिंबोऱ्या, कोंबडी वड्यांचा नैवेद्य केला जातो का? तिखटाची गौरी म्हणजे काय?

आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ही गणेशमूर्ती आहे कुठे? तर मंडळी ही मूर्ती भारत किंवा नेपाळमध्ये नसून थायलंडमधील चाचोएंगसाओ येथे आहे. क्लोंग केयुन जिल्ह्यातील चाचोएंगसाओ येथे ४०,००० चौरस मीटर जमिनीवर ही मूर्ती बांधलेली आहे. उंचावरून बाप्पाला भक्तांवर लक्ष ठेवता येईल, त्यांची धन- आरोग्य स्थिती सुरळीत ठेवता येईल यासाठी इतकी उंच मूर्ती साकारण्यात आल्याचे सांगितले जाते. ख्लोंग खुआन गणेश आंतरराष्ट्रीय उद्यान चाचोएंगसाओ आणि थायलंडमधील एक पर्यटक आकर्षण आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 14th floor building height of world tallest ganpati idol video take darshan here did you know these unique ganesh murti svs

First published on: 21-09-2023 at 16:19 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×