Vande Bharat Express Technology : भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण वेगानं होत असून रेल्वेच्या माध्यमातून सेमी हायस्पीड ट्रेन चालवण्यात येत आहेत. वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनही याच आधुनिकीकरणाचं एक उदाहरण आहे. प्रवास सुखरुप होण्यासाठी रेल्वेकडून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमध्येही अशाच प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ज्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान एक जबरदस्त अनुभव मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका वृत्तवाहिनीच्या Ideas Of India 2023 या कार्यक्रमात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं की, वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये एअर स्प्रिंग टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. इतर ट्रेनच्या तुलनेत या एक्स्प्रेमधून प्रवास करण्याचा अनुभव खूप चांगला आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये वापरण्यात आलेल्या टेक्नोलॉजीमुळे प्रवाशांना आरामदायक प्रवास करता येतो. इतर ट्रेनमध्ये आणि या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये नेमका फरक काय आहे? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

ट्रेन सुरु झाल्यावर आवाज येतो पण वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आवाज येत नाही

ट्रेनच्या एका कोचमध्ये २ डब्बे असतात. या कोचमध्ये संपूर्ण भागात स्प्रिंग्स लावण्यात आल्याने डब्ब्यांना मजबूती मिळते. जेव्हा ट्रेन रुळावरून धावते, त्यावेळी छोटे मोठे झटके लागतात. पण या एक्स्प्रेसमध्ये बसवलेल्या स्प्रिंगमुळे झटके लागण्याचं प्रमाण कमी होतं. मात्र, इतर ट्रेन सुरु झाल्यानंतर झटके लागल्याचं जाणवतं. तसंच जेव्हा ट्रेन सुरु होते, तेव्हा रुळावर ट्रेनचा धडधडणारा आवाज ऐकू येतो. याच स्प्रिंगमुळे तो आवाज निर्माण होतो. संपूर्ण कोचचा वजन या स्प्रिंग्सवर असतो आणि या स्प्रिंग्स डब्ब्याला जोडलेल्या असतात. तसंच रेल्वे रुळ एकदम सरळ नसतात, जेव्हा ट्रेन रुळावरुन धावते त्यावेळी प्रवाशांना आवाज ऐकू येतो. पण वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये हा आवाज ऐकू येत नाही.

नक्की वाचा – भारतातील या किल्ल्यावरून पाकिस्तान दिसतो, त्या गेटवरची रहस्यमय कहाणी वाचून तुम्हीही थक्क व्हाल

….म्हणून वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आवाज येत नाही

वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये बसलेल्या प्रवाशांना अशाप्रकारचा आवाज ऐकू येत नाही. कारण या एक्स्प्रेसमध्ये एअर स्प्रिंग्स लावण्यात आल्या आहेत. एअर स्प्रिंग्समध्ये हवा भरलेली असते, ज्यामुळे स्प्रिंगचा काम सुरु राहतं. या एअर स्प्रिंगचं कनेक्शन एक चेंबरसोबत असतं. त्यामुळे हवेच्या दाबाला नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. या एअर स्प्रिंगमुळे ट्रेन सुरु झाल्यावर मोठ्या प्रमाणात झटके लागत नाहीत आणि ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांना बाहेरील आवाज ऐकू येत नाही.

एअर स्प्रिंगमुळे ब्रेक सिस्टमलाही होतो फायदा

एअर स्प्रिंग ट्रेनच्या ब्रेक सिस्टमला अॅडजस्ट करते. ट्रेनची चाके आमि ब्रेकमध्ये एक मोकळी जागा सोडलेली असते. पण जेव्हा ट्रेनमधून खूप लोक प्रवास करतात, तेव्हा वजन वाढल्याने ब्रेक थोडे खाली येतात. अशा परिस्थितीत चाके आणि ब्रेकमध्ये जास्त गॅप निर्माण होतो. कधी कधी हा गॅप एव्हढा कमी होतो की, ट्रेन सुरु झाल्यावर जळल्यासारखा वास येतो. जुन्या स्प्रिंग्समुळे अशीच समस्या येत होती. मात्र, एअर स्प्रिंग्स चाके आणि ब्रेकमधील गॅप स्वत:च अॅडजस्ट करतं.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air spring technology used in vande bharat express train know the difference between train and vande bharat express nss
First published on: 25-02-2023 at 11:50 IST