Ram Mandir Puja Video: अयोध्या राम मंदिराच्या अभूतपूर्व सोहळ्याच्या निमित्ताने आज भारतातच नव्हे तर जगभरात रामभक्तांमध्ये प्रचंड ऊर्जा दिसून येत आहे. ज्यांना आमंत्रण होते त्यांनी अयोध्येत पोहोचून तर अन्य भाविकांनी आपापल्या घरातून श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा अनुभव घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ११ दिवसांच्या धार्मिक अनुष्ठानानंतर आज १२ वाजून २९ मिनिटांनी सुरु झालेल्या शुभ मुहूर्तावर रामलल्ला यांच्या मूर्तीची पूजा केली. ५०० वर्षांनी अयोध्येच्या मंदिरात परतलेल्या प्रभू श्री रामांच्या मूर्तीवरील प्रसन्नता पाहून देशवासीयांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. प्रभू श्रीरामाच्या या पूजेदरम्यान गाभाऱ्यात अनेक भजने व गीतांचे वादन होत होते. त्यातील एका गीताला मात्र सर्वप्रथम प्राधान्य देण्यात आले होते ते म्हणजे ‘पायो जी मैने राम रतन धन पायो..”

‘पायो जी मैने राम रतन धन पायो..” या गाण्याची धून आपणही जाणून असाल पण हे गीत नेमके कोणी रचले, कोणी गायले व त्याचा भावार्थ काय हे आज आपण अयोध्येच्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर जाणून घेणार आहोत. पायो जी मैने राम रतन धन पायो ही १५ व्या शतकातील भारतीय कवयित्री मीराबाई यांची राजस्थानी भाषेतील कविता आहे. या कवितेत मीराबाई म्हणतात की, “मला देवाच्या नावाची मोठी संपत्ती प्राप्त होते”. ही कविता भारतरत्न लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजात प्रसिद्ध गीतारूपात आजवर आपण ऐकत आलो आहोत.

काय आहेत गीताचे बोल?

पायो जी मैंने नाम रतन धन पायो ।
वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, किरपा करी अपनायो ॥
जनम जनम की पूँजी पाई, जगमें सभी खोवायो ।
खरचै न खूटै चोर न लूटै दिन दिन बढ़त सवायो ॥
सत की नाव खेवटिया सतगुरु भवसागर तर आयो ।
मीरा के प्रभु गिरिधर नागर हरख हरख जस गायो ॥

Ram Murti Puja First Look: रामलल्ला विराजमान! मोदींच्या हस्ते पूजा, पाहा ‘त्या’ ऐतिहासिक क्षणाची पहिली झलक,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पायो जी मैंने नाम रतन धन पायो गीताचा अर्थ काय?

भगवंताच्या नावाचा खजिना मला प्राप्त झाला आहे. माझ्या गुरू देवाने मला ही अनमोल भेट दिली आहे आणि मी ते मोठ्या कृतज्ञतेने स्वीकारली आहे.
मला माझ्या आयुष्यातील सर्वात हवाहवासा खजिना गवसला आहे, भगवंताच्या नामाचा हा खजिना ना विझणार, ना चोर चोरून नेणार. उलट तो दिवसागणिक वाढत जाणार आहे. सत्याची नाव माझ्या मार्गदर्शक देवाने ओढली आहे आणि अशा प्रकारे मी हा जीवनसागर पार करणारआहे. हे माझ्या प्रिय कृष्णा! मी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने तुझी स्तुती गात आहे.