scorecardresearch

भारत-पाकिस्तान सीमेवर तारांच्या कुंपणाला बिअरच्या बाटल्या का टांगतात? यामागचं कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

भारत-पाकिस्तान सीमेवर रिकाम्या बाटल्या टांगल्याने जवानांना कोणती गुपित माहिती मिळते? वाचा सविस्तर बातमी

Border Security Force In India
भारत-पाकिस्तान सीमेवर बाटल्या का टांगतात? (Image-Graphics Team)

India-Pakistan Border : सीमा सुरक्षा दलाचे जवान भारत देशाच्या सीमेवर रात्रंदिवस गस्त घालून देशाचं संरक्षण करत असतात. थंडीच्या दिवसात धुक्याची चादर पसरल्यावर आजूबाजूच्या परिसरातील दृष्य दिसेनासं होतं. पण हेच जर सीमा सुरक्षा भागात असेल, तर परिस्थिती किती गंभीर होते, याचा आपल्याला अंदाजही लावता येणार नाही. याच कारणामुळं भारत-पाकिस्तान सीमेवर हायअलर्ट घोषीत केलं जातं. पाकिस्तानच्या सैन्यांकडून घुसखोरी किंवा कोणत्याही प्रकारची चकमक होऊ नये, यासाठी सीमेवर हायअलर्ट जारी करण्यात येतं. पण आता एक देसी जुगाड सीमेवर करण्यात येत आहे. सीमेवर असणाऱ्या तारांच्या कुंपनाला बिअरच्या काचेच्या रिकाम्या बाटल्या का लावल्या जातात, यामागचं कारण वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

सीमेवरील कुंपणाला बिअरच्या रिकाम्या बाटल्या लावतात, यामागचं कारण एकदा वाचाच

बीएसएफने राजस्थानपासून जम्मूपर्यंत तारेच्या कुंपणाला काही अंतरावर काचेच्या रिकाम्या बाटल्या टांगल्या आहेत. जर कुणी या तारांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, तर तारांना लावलेल्या बाटल्यांची एकमेकांना टक्कर होईल आणि अलार्म वाजेल. यामुळे जवानांना दुश्मनांच्या घुसखोरीबाबत माहिती मिळते आणि सीमेवर जवान अलर्ट होतात. बाटल्यांच्या वापर अशाप्रकारे केल्यामुळं धुक्याचं वातावरण असल्यावरही दुश्मन देशात घुसघोरी करण्याचा प्रयत्न करणार नाहीत.

नक्की वाचा – एकाच जागेवर दोन वेगवेगळे रेल्वे स्टेशन, महाराष्ट्रातील या ठिकाणी ट्रेन पकडताना प्रवाशांचा होतो गोंधळ

भारत-पाकिस्तान सीमेवरील अंतर किती?

रिपोर्टनुसार, भारत-पाकिस्तान सीमेची एकूण लांबी ३३२३ किमी आहे. या सीमांना राज्यांनुसार विभागलं तर, जम्मू-काश्मीर पाकिस्तान सीमेची लांबी १२२५ किमी आहे. राजस्थान-पाकिस्तान सीमेची लांबी १०३७ किमी, पंजाब-पाकिस्तान सीमेची लांबी ५५३ किमी आणि गुजरात-पाकिस्तान सीमेची लांबी ५०८ किमी आहे. या सर्व सीमांवर देशाचे जवान सतर्क राहून गस्त घालत असतात आणि देशाचं रक्षण करत असतात. श्रीगंगानरची सीमा पाकिस्तानी दुश्मनांच्या निशाण्यावर असते, अशीही माहिती आहे. या सीमेजवळ तारांच्या कुंपणाजवळ शेतकरी शेती करतात. दुश्मन या परिसरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळ बीएसएफ जवान नेहमीच सतर्क राहतात आणि सीमेवरील हालचालींवर लक्ष ठेवतात.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 11:05 IST