Do You Know This Country Living in 2015 why They are Living 7 Years Behind World What Was Main Decision | Loksatta

‘या’ देशात अजून २०१५ वर्षच सुरु आहे! जगापेक्षा ७ वर्ष मागे राहण्यात कारण ठरला ‘हा’ निर्णय

Did You Know: विचारसरणी किंवा आधुनिकतेचा अभाव यामुळे २०१५ मध्ये जगत असल्याचे म्हणत नाही आहोत उलट या देशात २०१५ चेच कॅलेंडर वापरले जात आहे.

Do You Know This Country Living in 2015 why They are Living 7 Years Behind World What Was Main Decision
२०१५ मध्ये जगतोय 'हा' देश (फोटो: Pixabay)

Country Living in 2015: सध्या कोणतं वर्ष सुरु आहे मित्रांनो? २०२३ बरोबर? नाही म्हंटलं तरी चुकून २०२२ लिहिण्याची सवयही आतापर्यंत गेली असेल. नव्या वर्षाचा पहिला महिना कसा सरून गेला हे कळलंही नाही असे मीम्स सुद्धा आतापर्यंत व्हायरल झाले आहेत. पण तुम्हाला माहित आहे का जगात असा एक देश आहे जिथे आतापर्यंत २०१५ सुरु आहे. नाही नाही विचारसरणी किंवा आधुनिकतेचा अभाव यामुळे २०१५ मध्ये जगत असल्याचे म्हणत नाही आहोत उलट या देशात २०१५ चेच कॅलेंडर वापरले जात आहे. जिथे जगभरात १२ महिन्यांचे वर्ष असते तिथे या देशात १ अधिक महिना म्हणजेच १३ महिन्यांचे वर्ष असते. म्हणजेच हा देश १३ महिन्यांनी नवीन वर्षाचं स्वागत करतो.

आपण एवढ्या वेळा ज्या देशाचं वर्णन वाचत आहोत त्याचे नाव आहे इथोपिया. आफ्रिकेतील इथोपिया देश हा जगापेक्षा ७ वर्ष मागे आहे. या देशात प्रत्येक वर्ष हे १२ नव्हे तर १३ महिन्यांचे असते. वर्षानुवर्षे या देशात हीच पद्धत फॉलो केली जाते. त्यामुळे जर तुम्हाला टाइम ट्रॅव्हल या संकल्पनेविषयी कुतुहूल असेल तर इथोपियाला जाण्याचा तुम्हीही नक्कीच विचार करू शकता.

इथोपियामध्ये जुलियस सीजरने बनवलेले कॅलेंडर वापरले जाते. म्हणूनच या देशात १२ ऐवजी १३ महिन्यांचे वर्ष असते, या आकडेवारीनुसार इथोपिया हे जगाच्या ७ वर्ष मागे आहे. जगभरात सध्या ग्रेगरियन कॅलेंडर फॉलो केले जाते मात्र इथोपियाने हे कॅलेंडर पाळण्यास नकार दिला आणि सीझरने बनवलेले ज्युलियन कॅलेंडर फॉलो केले जाते.

हे ही वाचा<<भारतातील ‘या’ २ ठिकाणी आहे शून्य गुरुत्वाकर्षण; महाराष्ट्रातील झिरो ग्रॅव्हिटी डोंगर माहित आहे का?

ग्रेगरियन कॅलेंडरची सुरुवात १३ व्या शतकात १५८२ मध्ये झाली होती. हे कॅलेंडर ज्युलियन पद्धतीत सुधारणा करून बनवलेले होते. यानुसार १ जानेवारीला नव्या वर्षाची सुरुवात होते. पूर्ण जगभरात हेच कॅलेंडर फॉलो केले जाते पण इथोपिया मध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरले जाते ज्यात एक अधिक मास असतो. हिंदू दिनदर्शिकांमध्ये सुद्धा काही वर्षी १३ महिने असतात ज्यामध्ये धोंडा म्हणजेच अधिक मास असतो.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 15:52 IST
Next Story
UPSC परीक्षा देणाऱ्यांनी एकदा वाचाच, IAS अधिकारी झाल्यावर वेतन किती? घर, गाडीसह ‘इतक्या’ सुविधा मिळणार