सोशल मीडियामुळे आपल्याला जगभरातील घडमोडींची माहिती क्षणार्धात मिळते. रोज आपल्यासमोर काही ना काही रंजक माहिती येत असते. त्यापैकी काही गोष्टी आपल्या ज्ञानात भर टाकणाऱ्या असतात, तर काही गोष्टी फक्त ट्रेंडसंबंधी असतात. यांपैकी काही आज घडणाऱ्या गोष्टींमागील इतिहास आणि कारणे याची माहिती देतात. कॅडबरी चॉकलेटच्या पॅकेजिंगबाबत सध्या एक रंजक माहिती समोर आली आहे. तुम्हाला माहीत आहे की, कॅडबरीच्या पॅकेजिंगचा रंग जांभळा आहे, पण का? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? सध्या याच विषयावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कॅडबरीने पॅकेजिंगसाठी जांभळा रंग कायम वापरत राहण्यासाठी कायदेशीर मार्ग स्वीकारला आहे. नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घेऊ या सविस्तर.

कॅडबरी केव्हापासून जांभळा रंग वापरत आहे?

कॅडबरी कंपनी १९१४ पासून जांभळा रंग वापरत आहे, जेव्हा त्यांनी राणी व्हिक्टोरियाला श्रद्धांजली म्हणून त्याचा वापर केला होता. यामुळे त्यांना नेहमीच प्रतिस्पर्ध्यांपासून वेगळी ओळख मिळते. कंपनीला १८५५ मध्ये रॉयल वॉरंट देण्यात आले होते, ज्यामुळे ते ब्रिटिश सम्राटासाठी अधिकृतपणे कोको आणि चॉकलेट बनवतात.

हेही वाचा –तुम्ही कधी पिवळं कलिंगड खाल्लं आहे का? चवीला अत्यंत गोड असलेल्या ‘या’ फळाबाबत जाणून घ्या

जांभळ्या रंगासाठी नेस्ले कंपनीने कॅडबरी कंपनीला खेचले कोर्टात

१९२० मध्ये संपूर्ण डेअरी मिल्क रेंजचा रंग जांभळा आणि सोनेरी झाला. या रंगाच्या वापरासाठी चॉकलेट जायंटला प्रतिस्पर्धी असलेल्या नेस्ले कंपनीने एकदा कोर्टात खेचले होते. २००४ मध्ये, कॅडबरीने ‘पँटोन 2865c’ नावाच्या विशिष्ट छटेचा ट्रेडमार्क करण्याचा प्रयत्न केला, ज्याला नेस्लेने विरोध केला आणि असा युक्तिवाद केला की, यासाठी कोणतेही विशेष अधिकार दिले जाऊ नयेत.

हेही वाचा – गोव्यामध्ये बिअर इतकी स्वस्त का मिळते? इतर राज्यांच्या तुलनेत एवढा फरक असण्याचे कारण जाणून घ्या

न्यायाधीशांनी फेटाळून लावले नेस्लेचे अपील

परिणामी, केसचा निकाल असा लागला की, ‘कॅडबरीचा जांभळा रंग’ कोणत्याही सुपरमार्केट किंवा स्पर्धकांद्वारे वापरण्यासाठी उपलब्ध आहे. परंतु न्यायाधीश कॉलिन बिर्स यांनी नेस्लेचे अपील फेटाळून लावले. त्यांच्या २०१२ च्या निकालात म्हटले, “पुरावा याचे स्पष्टपणे समर्थन करतो की, जांभळा (पँटोन 2865c’) हा कॅडबरीचा मिल्क चॉकलेटसाठी वैशिष्ट्यपूर्ण रंग आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा प्रकारे, असा निर्णय देण्यात आला की, ट्रेडमार्क रंगाच्या विशिष्ट छटेचे तंतोतंत संरक्षण करतो, पण संपूर्णपणे जांभळ्या रंगाचे नाही. याचा अर्थ नेस्ले अजूनही जांभळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटांचे रॅपिंग वापरू शकते.