Ganpati Pratishthapana : जाणून घ्या गणेश प्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्त आणि विधी

बाप्पाची प्रतिष्ठापना कशी करावी, त्याची योग्य ती पद्धत काय आहे याविषयी….

गणपती हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत. त्यामुळे गणेशोत्सव तर बाप्पाच्या भक्तांसाठी मोठा सोहळाच. मात्र यंदाच्या गणेशोत्सवावर करोनाचे सावट असल्याने अनेकांना गणरायांची प्रतिष्ठापना करण्यासंदर्भातील चिंता लागून राहिलेली आहे. अनेक ठिकाणी गुरुजी व्हिडिओ कॉलवरुन पूजा सांगणार आहेत. तर काहीजण घरी स्वत: गणरायांची प्रतिष्ठापना करणार आहेत. मात्र अनेकदा गणरायांची प्रतिष्ठापना शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करायची याबाबत पुरेशी माहिती नसते. सध्याच्या परिस्थितीमध्ये ऐनवेळी गुरुजीही मिळण्याची शक्यता कमीच आहे. अशावेळी आपल्याला पूजेची योग्य ती माहिती असल्यास त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होतो. घरच्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना कशी करावी, त्याची योग्य ती पद्धत काय आहे याविषयी….

पूजेचा मुहूर्त:

यंदा शनिवार, २२ ऑगस्ट २०२० रोजी गणपती बाप्पाचे आगमन होत आहे.

मध्याहन गणेश पूजा मुहूर्त – सकाळी ११:०६ पासून दुपारी ०१:४२ पर्यंत
वर्जित चंद्र दर्शनाचा काळ – सकाळी ०९:०७ पासून दुपारी ०९:२६ पर्यंत
चतुर्थी तिथि आरंभ – २१ ऑगस्ट शुक्रवारी रात्री ११ वाजून ०२ मिनिटांपासून
चतुर्थी तिथी समाप्ती – २२ ऑगस्ट शनिवारी संध्याकाळी ७ वाजून ५७ मिनिटांपर्यंत

स्नान करुन घरातील देवांची पूजा करुन नंतर गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करावी.

साहित्य –

हळद, कुंकू, अक्षता, गुलाल, अष्टगंध, सुपारी १०, खारीक ५, बदाम ५, हळकुंड ५, अक्रोड५, ब्लाउज पीस १, कापसाची वस्त्रे, जानवी जोड २, पंचा १, तांदूळ, तुळशी, बेल, दुर्वा, फुले, पत्री, हार १, आंब्याच्या डहाळे, नारळ २, फळे ५, विड्याची पाने २५, पंचामृत, कलश २, ताम्हण १, पळी, पंचपात्र, सुटे पैसे, नैवेद्याची तयारी, समई, वाती, निरांजन, कापूर.

इतर तयारी –

१. गणेशाची मूर्ती शक्यतो आदल्या दिवशी आणून ठेवावी
२. मूर्ती मखरात ठेवावी, सर्व पूजेचे साहित्य तयार ठेवावे
३. बसण्यासाठी आसन किंवा बेडशीट
४. घरात वादविवाद न करता प्रसन्नपणे सर्वांनी एकत्र असावे.
५. देवासाठी काहीही समर्पण करताना ते उजव्या हातानेच वाहावे.
६. मूर्तीवर पाणी, पंचामृत, अर्घ्य वाहताना फुलाने किंवा दुर्वांनी वाहावे
७. वडीलधाऱ्यांपैकी एकाने पूजा सांगावी. दुसऱ्या व्यक्तीने पूजा करावी

गणेशपूजा पद्धती –

१. प्रथम कपाळी तिलक धारण करून आचमन करावे.
२. देवापुढे पानसुपारीचा विडा ठेवावा
३. देवास नमस्कार करून वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि पुजेला प्रारंभ करावा.
४. आसनावर बसावे.
५. हातात अक्षता घेऊन श्रीगणेशाचे मनात स्मरण करावे
६. अक्षता श्रीगणेशाच्या पायांवर वाहाव्यात.
७. उजव्या हातात दोन पळ्या पाणी घेऊन त्यात गंध, अक्षता, फुले घेऊन मंत्रोच्चार करावा.
८. श्रीगणेशाचे स्मरण करून कलश, शंख, घंटा, दिवा, समई यांची पूजा करावी गंध, अक्षता, फुले, हळद कुंकू वहावे
९. नमस्कार करून उजवा हात मूर्ती वर ठेवावा डावा हात स्वतःच्या हृदयास स्पर्श करून श्रीगणेशाचे ध्यान करावे
१०. गणेशाच्या चरणांवर दुर्वा किंवा फुलाने पाणी शिंपडावे
११. गणपतीच्या चरणांवर गंध फुल अक्षता यांनी युक्त पाणी वाहावे
१२. ताम्हणात ४ वेळा पाणी सोडावे
१३. गणेशाच्या मूर्तीवर पाणी शिंपडावे, चरणांवर पंचामृत वहावे, अक्षता वाहाव्यात
१४. गंध लावावे, हळद, शेंदूर, फुले,हार, कंठी, दुर्वा वाहाव्यात.
१५. प्रत्येक अवयवांवर अक्षता वाहाव्यात, विविध पत्री अर्पण कराव्यात
१६. धूप, अगरबत्ती ओवाळावी. दीप, निरांजन ओवाळावे
१७. नैवेद्य, प्रसाद अर्पण करावा. विडा अर्पण करावा.
१८. विड्यावर दक्षिणा ठेवावी, समोरील नारळावर पळीभर पाणी सोडावे आणि त्यावर एक फुल वाहावे
१९. आरती करावी, स्वतः भोवती प्रदक्षिणा घालावी
२०. श्री गणेशास नमस्कार करावा, प्रार्थना करावी, एक पळीभर पाणी ताम्हणात सोडावे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ganesh pratishthapana shubh muhurat and puja process in marathi scsg

Next Story
जाणून घ्या नव्या वर्षातील बँकांच्या सुट्या
ताज्या बातम्या