बँकेत खातं उघडण्यापासून पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्ससारख्या गरजेच्या सेवा मिळवण्यासाठी आधारकार्ड उपयोगी पडतं. पण, याच आधारकार्डावर नाव, पत्ता, मोबाईल नंबर, जन्म दिनांक यांसारख्या विविध चुका झाल्या असल्यास टेन्शन आल्याशिवाय राहत नाही. पण आता आधारकार्डवरील नाव, पत्ता किंवा इतर माहिती चूकीची असल्यास वैतागाची गरज नाही. कारण आधारवरील चुका तुम्हाला ऑनलाइन दुरूस्त करता येणार आहेत. त्यामुळे तुमचा त्रास आणि वेळही वाचणार आहे. जाणून घेऊयात आधारकार्डवरील चुका ऑनलाइन कशा दुरूस्त करता येतील…

– आधारच्या अधिकृत वेबसाईटला https://uidai.gov.in/ भेट द्या

– वेबसाईटवर गेल्यानंतर खाली डाव्या बाजुला लिहिलेल्या माय आधारवर your aadhar data किंवा ‘आपकी आधार’ वर क्लीक करा

– तुम्हाला जी जी माहिती अपडेट करायची आहे त्याबद्दल या पेजवर विचारलेलं असेल. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल. यामध्ये ‘सबमिट युअर अपडेट’वर क्लिक करा.

– ‘enter your aadhar number’वर तुमचा आधार क्रमांक टाका

– टेक्स्ट व्हिरिफिकेशनमध्ये स्क्रीनवर दाखवलेले स्पेशल कॅरेक्टर टाका आणि ‘ओटीपी’वर क्लिक करा

– याच्या पुढच्या पेजवर मोबाईल नंबर टाकण्याचे संकेत मिळतील. काही वेळात तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ‘ओटीपी’चा मॅसेज येईल. हा तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर निर्धारीत बॉक्समध्ये नोंदवावा लागेल. यानंतर वेबसाईट लॉग इन करा.

– डाटा अपडेटवर क्लिक केल्यानंतर प्रोसेस्डवर क्लिक केल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रांची क्लिअर फोटो किंवा स्कॅन करून अपलोड करावे लागतील.

– यानंतर ‘कन्फर्म’वर क्लिक करण्याचे आदेश मिळतील. यानंतर ‘बीपीओ सर्व्हिस प्रोव्हायडर’वर क्लिक करा. जिथे बाजुला लिहिलेल्या एजिस आणि कार्विसला निवडून सबमिट करावं लागेल.

– अपडेट झाल्यानंतर मोबाईलवर मॅसेज येईल. यामध्ये तुम्हाला ‘यूआरएन’ नंबर मिळेल. अपडेट स्टेटसवर आधार कार्ड नंबर आणि यूआरएन टाईप करावा लागेल.

अशाप्रकारे तुम्हाला आधार कार्डच्या माहितीमध्ये बदल करता येईल. याशिवाय दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन चुकिची माहिती बदलू शकता, पण तेथे जाताना संबंधित कागदपत्रं बरोबर बाळगणं आवश्यक आहे.