Largest Railway Junction in India: भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वेनेटवर्क पैकी एक आहे. रेल्वेने प्रवास करणारी अनेक माणसे आहेत. रेल्वेचा प्रवास हा सोपा आणि स्वस्त मानला जातो. आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे जंक्शन बद्दल सांगणार आहोत. जे कधीही रिकामी राहत नाही. याठिकाणी २४ तास गाड्यांची ये जा असते. तुम्ही या जंक्शनवरून देशातील कोणत्याही ठिकाणाची ट्रेन पकडू शकता. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर..

देशातील सर्वात मोठे मथुरा रेल्वे जंक्शन

मथुरा हे देशातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन आहे. मथुरा रेल्वे जंक्शन हे यूपीच्या मथुरा जिल्ह्यात बांधले गेले आहे. हे रेल्वे जंक्शन उत्तर मध्य रेल्वेच्या अंतर्गत येते. या जंक्शनच्या माध्यमातून पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेसाठी ७ वेगवेगळ्या मार्गाच्या गाड्या जातात. या स्थानकावर एकूण १० प्लॅटफॉर्म आहेत, ज्यावर नेहमीच गाड्यांची ये जा असते.

गाड्या सतत येत जात असतात

तुम्ही याठिकाणी दिवस रात्र कधीही आलात तर तुम्हाला नेहमी याठिकाणाहून शेकडो गाड्या सतत जाताना दिसतील. देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात जाण्यासाठी तुम्ही येथून ट्रेन पकडू शकता. १८७५ मध्ये या जंक्शनवरून पहिल्यांदा ट्रेन धावली.

( हे ही वाचा; सर्व रेल्वे रुळांवर दगड टाकले जातात पण रेल्वे स्टेशनजवळ का नाही? यामागचे कारण जाणून थक्क व्हाल)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वच्छता ठेवण्यासाठी काम केले जात आहे..

रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे जंक्शन देशातील १०० रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. ज्याठिकाणी सर्वाधिक जास्त बुकिंग होते. असे असूनही या जंक्शनवरील स्वच्छतेचा अभाव ही रेल्वेसाठी मोठी समस्या आहे. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या २०१८ च्या अहवालानुसार, सर्वेक्षण केलेल्या ७५ प्रमुख स्थानकांमध्ये हे स्टेशन सर्वात कमी स्वच्छ म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हापासून याठिकाणी सातत्याने साफसफाईचे काम सुरू आहे.