Indian Railway Interesting Facts: भारतीय रेल्वे ही जगभरातील विस्तृत रेल्वे नेटवर्क पैकी एक आहे. अगदी पाकिस्तानापासून ते अरुणाचल प्रदेशापर्यंत व जम्मू पासून ते कन्याकुमारी पर्यंत रेल्वेचे विस्तृत जाळे पसरलेले आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का की भारतातील एक ट्रेन चक्क सिंगापूरला सुद्धा जाते. म्हणजे पाकिस्तान, नेपाळ, चीन या भारताच्या सीमेवरील देशांमध्ये रेल्वेचे नेटवर्क हे समजता येते पण चक्क सिंगापूरला जायचं आणि ते ही ट्रेनने, हे जरा आक्रितच वाटतंय ना. पण इतकंच नाही हा मंडळी या ट्रेनने सिंगापूरला जायला कोणताही पासपोर्ट- व्हिजा सुद्धा लागत नाही. चला तर मग आज आपण भारतातल्या सिंगापूर ट्रेनविषयी जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात ओडिशा राज्यात सिंगापूर नावाचे रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनच्या नावाचा उच्चार जरी असा असला तरी मूळ इंग्रजी स्पेलिंग वेगवेगळी आहे. या स्थानकाचे नाव सिंगापूर रेल्वे स्टेशन (Singapur Railway Station) असे आहे. ओडिशाला जाणाऱ्या ट्रेनच्या मार्गावर सिंगापूर रेल्वे स्टेशन लागते. अनेकदा आजवर परदेशी प्रवाशांनी यावर व्हिडीओ व ब्लॉग सुद्धा पोस्ट केले आहेत. ट्रेनचे भाडे भारतीय रेल्वेच्या अन्य ट्रेनप्रमाणेच प्रवासाच्या अंतरावर अवलंबून आहे.

हे ही वाचा<< फडणवीसांच्या घोषणेवरून आजींचा बसमध्ये राडा; जीव घेण्याची धमकी देत कंडक्टरला मारहाण, Video पाहिलात का?

मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, बिलासपुर तिरुपति एक्सप्रेस, समता एक्सप्रेस, हीराखंड एक्सप्रेस सह २५ हुन अधिक ट्रेन या सिंगापूर स्थानकात थांबतात. ईस्ट कोस्ट रेल्वेने १८९९ मध्ये हे रेल्वे स्टेशन बांधले होते. दररोज १०,००० प्रवाशांची या स्टेशनवर दिवसभरात रेलचेल असते.या स्थानकात तीन प्लॅटफॉर्म व चार रूळ आहेत. कोलकाता आणि चेन्नई सारख्या प्रमुख शहरांना हे स्थानक जोडते. पुरी जगन्नाथ मंदिराला भेट देणाऱ्या यात्रेकरूंसाठी सिंगापूर स्थानक हा एक लोकप्रिय थांबा आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railway train to singapur railway station in odisha history travel route to singapur will shock you svs
First published on: 17-03-2023 at 16:45 IST