तुर्कस्तान आणि सीरियामध्ये मोठा भुकंप झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. भुकंपामुळे आतापर्यंत ५००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इमारतींचे मलबे एकापाठोपाठ एक कोसळल्याने हजारो नागरिक यात अडकल्याने खळबळ उडाली आहे. तुर्कस्तानमध्ये झालेल्या या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर तेथील सरकारकडून राष्ट्रीय दुखवटाही जाहीर करण्यात आला आहे. भुकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे मोठमोठ्या इमारती जमिनदोस्त झाल्या आहेत. अशा परिस्थितीत भुकंपरोधक घरांची आवश्यकता असल्याचं अनेकांना वाटतं. भुकंपरोधक घर बनवण्यासाठी सामान्य घरापेक्षा ५ ते १० टक्के जास्त खर्च येत असल्याचं एक्सपर्ट सांगतात. भुकंपरोधक घरांचं बांधकाम सामान्य इमरतींपेक्षा वेगळं असतं. पण खरंच या इमारतींना भुकंपाचा धक्का लागत नाही? भुकंपाची तीव्रता मोठी असल्यावरही ही घरे खाली पडत नाहीत? अशाप्रकारचे प्रश्नही उपस्थित होतात.

भुंकप झाल्यावर खरंच या इमारती जमिनदोस्त होत नाहीत?

जगात कुठेही अशी इमारत नाहीय, जी १०० टक्के भूकंपरोधक आहे. इंजीनियर आणि आर्कियोलॉजीस्ट पृथ्वीपेक्षा मजबूत गोष्टीचा शोध लावण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्याही इमारतीला भुकंपाचे धक्के सहन करण्याची क्षमता, त्या इमारतीचे बांधकाम, इमारतीसाठी वापरलेलं साहित्य आणि डिझाईनवर अवलंबून असतं. भुकंपरोधक इमारती बनवण्यासाठी बांधकामाची प्रक्रिया अत्यंत महत्वाची असते.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…
misbehavior at toll booth where can you complaint how to deal with toll employees nhai fastag helpline
टोल नाक्यावरील कर्मचारी तुमच्याबरोबर चुकीच्या पद्धतीने वागले तर काय कराल? वाचा सविस्तर

भूकंपाच्या धक्क्यापासून संरक्षण करण्यासाठी इमारतींचे प्राथमिक लेआऊट वेगळ्या पद्धतीने तयार केलं जातं. या इमारती विशेष मटेरियल आणि कॉलमच्या बांधकामांनी तयार केली जातात. यामुळे अशा इमारतींना भुकंपाचे धक्के मोठ्या प्रमाणात जाणवत नाहीत. या इमारतींचे मटेरियल आणि कॉलम (बीम) भुकंपांच्या धक्क्यांना अटकाव आणतात. कोणत्याही इमारतींना भूकंपरोधक बनवण्यासाठी खाली दिलेल्या गोष्टींना फॉलो केलं जातं.

पाया मजबूत बांधणे

इमारतीला भुकंपरोधक बनवण्यासाठी फाउंडेशनचे बांधकाम मजबूत करावे लागते. जमिनीच्या वरच्या भागात अशाप्रकारचे बांधकाम करु नये. फाऊंडेशनला बेस आयसोलेशनच्या माध्यमातून मजबूत केलं जावू शकतं. बेस आयसोलेशन एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये भुकंपावेळी जेव्हा इमारतीचा पाया हालतो, तेव्हा त्याच्या खालच्या भागातील आयसोलेटर्स हलतात आणि इमारत स्थिर उभी राहते.

नक्की वाचा – भारत-पाकिस्तान सीमेवर तारांच्या कुंपणाला बिअरच्या बाटल्या का टांगतात? यामागचं कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

बांधकाम स्टक्चरला मजबूत करणे

इमारतींच्या स्ट्रक्चरला क्रॉस ब्रेसिज आणि शीयर वॉल पद्धतीने मजबूत केलं जातं. इमारतीला मजबूत करण्यासाठी मोमेंट-रेसिस्टेंट फ्रेम आणि डायाफ्रामही आवश्यक असतं.

शीयर वॉल

शीयर वॉल इमारतींना भूकंपाचे धक्के रोखण्यासाठी मदत करतात. शीयर वॉल अनेक पॅनल्सने बनवलेले असतात आणि भुकंपावेळी इमारतीला मजबूत राहण्यासाठी मदत करतात.

मोमेंट रेसिस्टेंट फ्रेम्स

मोमेंट रेसिस्टेंट फ्रेम्स इमारतीच्या डिझाईनमध्ये प्लास्टिसिटी निर्माण करतं. या पद्धतीचा वापर केल्यावर इमारत भुकंपामुळे होणाऱ्या शॉकवेवचा विरोध करण्यात सक्षम होते.

मटेरियलची भूमिका महत्वाची

भुकंप आल्यानंतर इमारत कोसळणार नाही, याची शाश्वती देता येत नाही. पण एक विशिष्ट प्रमाणात असलेला भुकंप अशा इमारतींना धोका पोहचवत नाही. भुकंपरोधक इमारत बनवण्यासाठी बांधकामात वापरण्यात आलेल्या साहित्याची महत्वाची भूमिका असते. भुकंपादरम्यान होणारे धक्क्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी मजबूत मटेरियलचा वापर केला पाहिजे. स्ट्रक्चरल स्टील इमारतींना तुटण्यापासून वाचवतं.