scorecardresearch

मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? यामागचे ‘हे’ कारण जाणून तुम्हीही पतंग उडवाल

Significance of Flying Kites on Makar Sankranti: मकर संक्रांतीला पतंग नेमका का उडवला जातो? यामागचं कारण तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊया यामागचं रंजक कारण…

मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? यामागचे ‘हे’ कारण जाणून तुम्हीही पतंग उडवाल
मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग का उडवतात(लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

Why Do We Fly Kites On Makar Sankranti Day: संक्रांत म्हटलं की तिळगुळ आणि तिळाचे लाडू हे आलेच पण संक्रांतीला पतंग उडवण्याचीही परंपरा आहे. पतंग उडवणे हा मकर संक्रांतीतील एक विधी आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवण्यासाठी या दिवसाची वाट पाहत असतात. संक्रांतीच्या काळात आकाश रंगीबेरंगी पतंगांनी भरुन जातं. बऱ्याच ठिकाणी पतंग महोत्सव देखील आयोजित केला जातो. पण संक्रांतीला पतंग नेमका का उडवला जातो? यामागचं कारण तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊया यामागचं रंजक कारण…

पतंग उडवण्यामागची ‘ही’ आहे कथा

मकर संक्रांतीला पतंग उडवण्यामागे एक कथा आहे. तामिळच्या तंदनान रामायणानुसार खरं तर भगवान श्रीराम यांनी मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा सुरू केली. असे मानण्यात येते की भगवान राम यांनी उडवलेला पतंग स्वर्गात गेला आणि हा पतंग स्वर्गात इंद्राचा मुलगा जयंत याच्या पत्नीला सापडला. त्याला पतंग आवडल्याने त्याने तो आपल्याजवळ ठेवला. तिकडे भगवान श्रीराम यांनी पतंग आणण्यासाठी हनुमानजींना पाठवले.

( हे ही वाचा: मकर संक्रांतीला तीळ आणि गुळाचे सेवन का करतात? जाणून घ्या यामागचे रंजक कारण)

जेव्हा हनुमानजी पतंग आणण्यासाठी स्वर्गात गेले तेव्हा जयंतच्या पत्नीने श्रीराम यांच्या दर्शनानंतरच पतंग परत करेन अशी अट घातली. त्यानंतर हनुमान जींनी भगवान श्रीराम यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला यावर राम म्हणाले ती मला चित्रकूट मध्ये पाहू शकेल. हनुमानजी हा आदेश घेऊन पुन्हा जयंतच्या पत्नीकडे गेले आणि तिला श्रीराम यांनी पाठवलेला निरोप सांगितला. यावर जयंतच्या पत्नीने श्रीराम यांचा पतंग परत केला.

( हे ही वाचा: ‘हे’ आहे जगातील असे एकमेव स्टेशन ज्याचे नाव वाचताना तुमचीही जीभ अडखळेल; हवं तर ट्राय करा)

‘हे’ आहे यामागील वैज्ञानिक कारण..

मकर संक्रांतीला पतंग उडवण्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. पतंग उडवल्यामुळे आपल्या हातापायांचा चांगला व्यायाम होतो. खरं तर मकर संक्रांतीच्या काळात थंडी असते. थंडीमध्ये अनेक आजार उद्भवतात. यावेळी जर आपण पतंग उडवायला गेलो तर आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. तसंच अनेक आजारांपासून सुटका होते. काय मग संक्रांतीला आता तुम्हीही पतंग उडवण्याची तयारी करताय ना? तर लगेच तयारीला लागा..

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 18:39 IST

संबंधित बातम्या