Major Railway Accidents In India: ओडिशामध्ये शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात किमान २८८ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ९०० जण जखमी झाले आहेत. ओडिशाच्या बालासोरमधील बहनगा स्टेशनजवळ बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने सायंकाळी ७ वाजता हा अपघात झाला. तर तिसरी ट्रेन म्हणजेच मालगाडीला पॅसेंजर ट्रेनचे रुळावरून घसरलेले डबे आदळले होते. ओडिशा रेल्वे अपघात हा मागील काही वर्षांतील सर्वात भीषण अपघात ठरला आहे. पण दुर्दैवाने हा भारतातील पहिलाच भीषण अपघात नाही. यापूर्वी भारतात घडलेल्या काही भीषण अपघातांचा इतिहास जाणून घेऊया..

1) धनुषकोडी ट्रेन, १९६४

२३ डिसेंबर १९६४ ला तामिळनाडूमधील धनुषकोडी येथे प्रचंड चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. रामेश्वरम चक्रीवादळामुळे पंबन-धनुषकोडी पॅसेंजर ट्रेन वाहून गेल्याने १२६ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

Horrific accident to speedy Scorpio 3 dead 5 injured in buldhana
बुलढाणा : भरधाव स्कॉर्पिओला भीषण अपघात, ३ ठार, ५ जखमी
power supply of Kalyan East was suddenly interrupted in early morning
उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव, उकाड्याने नागरिक हैराण
uran, irresponsible, heavy vehicle parking, cause accident, jnpt palaspe national highway, marathi news,
उरणमध्ये बेदरकार अवजड वाहनांची दहशत कायम
Mobile theft in Local train
प्रवाशाच्या व्हिडिओमुळं मुंबई ट्रेनमधील मोबाइल चोर पकडला आणि एका मृत्यूचंही गूढ उकललं

2) बागमती ट्रेन अपघात, १९८१

६ जून १९८१ ला बिहारमध्ये बागमती नदीत ट्रेन कोसळल्याने भारतातील सर्वात मोठा रेल्वे अपघात घडून आला होता. या अपघातात तब्ब्ल ७५० लोकांचा मृत्यू झाला होता. नदीत पडलेल्या मृतांची नेमकी संख्या निश्चित होऊ शकली नव्हती. पुढे तपासात मृतांची संख्या ८०० ते २००० पर्यंत पोहोचली असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

3) फिरोजाबाद रेल्वे अपघात, १९९५

१९९५ मध्ये उत्तर प्रदेशातील फिरोजबादजवळ झालेल्या रेल्वे अपघातात एकूण ३१० जणांना अधिकृतरित्या मृत घोषित करण्यात आले होते. २० ऑगस्ट १९९५ रोजी पुरुषोत्तम एक्सप्रेस फिरोजाबादजवळ थांबलेल्या कालिंदी एक्सप्रेसला धडकली होती. या अपघातानंतर, सरकारने १९९६ मध्ये संसदेत, धावत्या मार्गावर फक्त एकाच ट्रेनचा प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी सिग्नल सर्किट्समध्ये बदल करण्याची, कम्युनिकेशन सुधारण्याची प्रक्रिया वेगाने पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते.

4) खन्ना रेल्वे अपघात, १९९८

खन्ना, पंजाब येथे १९९८ मध्ये दोन गाड्यांच्या अपघातात २१२ लोकांचा मृत्यू झाला होता. २६ नोव्हेंबर १९९८ रोजी, जम्मू तवी-सियालदह एक्सप्रेस पंजाबमधील खन्ना येथे फ्रंटियर गोल्डन टेंपल मेलच्या रुळावरुन घसरलेल्या तीन डब्यांना धडकली होती.

5) गैसल ट्रेन अपघात, १९९९

१९९९ मधील गैसल ट्रेन दुर्घटनेत २८५ हून अधिक लोक ठार आणि ३०० हून अधिक जखमी झाले होते. २ ऑगस्ट १९९९ रोजी, उत्तर सीमा रेल्वेच्या कटिहार विभागातील गैसल स्थानकावर ब्रह्मपुत्रा मेल, अवध आसाम एक्स्प्रेसला आदळल्याने हा अपघात घडला होता. मृतांपैकी अनेकजण लष्कर, बीएसएफ, सीआरपीएफचे सैनिक होते.

6) रफीगंज अपघात, २००२

२००२ मध्ये हावडा राजधानी एक्स्प्रेसमुळे झालेल्या रफीगंज अपघातात १४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. ९ सप्टेंबर २००२ रोजी बिहारमधील रफीगंजमधील धवे नदीवरील पुलावरून हावडा राजधानी एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने रफीगंज ट्रेनचा अपघात झाला. टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, हे दहशतवादी कृत्य असल्याचे म्हणत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष IIMS राणा यांनी या घटनेला पाकिस्तानस्थित संघटना किंवा माओवादी जबाबदार असल्याचे त्यावेळी सांगितले होते.

7) ज्ञानेश्वरी एक्सप्रेस अपघात, २०१०

२८ मे २०१० रोजी, मुंबईकडे येणारी ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस ट्रेन झारग्रामजवळ रुळावरून घसरली आणि पुढे येणाऱ्या मालगाडीला धडकली होती, या अपघातात १४८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

8) हंपी एक्सप्रेस अपघात, २०१२

आंध्र प्रदेशमध्ये मालवाहू ट्रेन आणि हुबळी-बंगळुरू हंपी एक्स्प्रेसची टक्कर झाल्याने ट्रेनचे चार डब्बे रुळावरून घसरले होते, अशातच एका डब्याने पेट घेतला होता. यामध्ये अंदाजे २५ मृत्यू आणि ४३ जण जखमी झाले होते.

9) गोरखधाम एक्सप्रेस अपघात, २०१४

उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरमधील खलीलाबाद स्टेशनजवळ गोरखधाम एक्स्प्रेसची एका थांबलेल्या मालगाडीला धडक बसली. या धडकेत २५ जणांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक जखमी झाले होते.

10) पुखरायण रेल्वे अपघात, २०१६

२०१६ मध्ये उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ पुखरायण येथे इंदूर-राजेंद्र नगर एक्स्प्रेस रुळावरून घसरली होती. यामध्ये एकूण १५२ लोक ठार झाले आणि २६० जखमी झाले होते. कानपूरपासून अंदाजे ६० किमी अंतरावर असलेल्या पुखरायण येथे इंदूर-राजेंद्र नगर एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरले होते.

11) उत्कल एक्सप्रेस अपघात, २०१७

पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेस मुझफ्फरनगरमध्ये रुळावरून घसरली. या अपघातात २३ ठार आणि जवळपास ६० जण जखमी झाले होते.

12) बिकानेर-गुवाहाटी एक्सप्रेस अपघात, २०२२

पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वार येथे बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसचे १२ डबे रुळावरून घसरल्याने नऊ जण ठार तर ३६ जण जखमी झाले होते.