Water Bottles Safety: अलीकडे प्रत्येक गोष्ट ही प्लॅस्टिकच्या बॉटल किंवा डब्यातून विकली जाते. विशेषतः एखादा द्रवयुक्त पदार्थ असेल तर त्यासाठी घट्ट बसणारे प्लॅस्टिकचे डब्बे बेस्ट पर्याय ठरतात. आपणही समजा कधी घरून निघताना पाण्याची बॉटल विसरलो तर कसलाही मागचा पुढचा विचार न करता दुकानातून प्लॅस्टिकच्या बॉटल विकत घेतो. बरं का मंडळी या प्लॅस्टिकच्या बॉटलमधील पाणी मिनरल किंवा अगदी हिमालयातून आणल्याचा जरी दावा केला असला तरी काही शुल्लक चुकांमुळे हे पाणी पिणं अगदी जीवावर बेतू शकतं. जसं की जेव्हा तुम्ही पाण्याची बॉटल विकत तळाकडे बघा. जर इथे तुम्हाला खालीलपैकी कोणतेही कोड दिसले तर ही बॉटल तुमच्या आरोग्यासाठी धोकायदायक ठरू शकते हे समजून जा.
जर तुमच्या पाण्याच्या बॉटलच्या तळाशी ३ किंवा ७ क्रमांक असेल तर याचा अर्थ असा की प्लॅस्टिकमध्ये बीपीए मिसळलेला असू शकतो. बॉटल किंवा पाणी विक्रेते जरी तुम्हाला सांगत नसतील तरी हा घटक आरोग्याला हानिकारक ठरू शकतो. हा नंबर तुम्हाला बॉटलच्या तळाशी असलेल्या त्रिकोणी भागात दिसून येईल. बॉटल खरेदी करतानाच कोड तपासून घेणे फायद्याचे ठरेल. जर तुमच्या बॉटलच्या तळाशी एक लिहिलेला असेल तर ही बॉटल केवळ एकदाच वापरावी व फेकून द्यावी.
मग नक्की कोणत्या प्रकारची पाण्याची बॉटल तुमच्यासाठी सुरक्षित असेल? तर ज्या बॉटलच्या तळाशी २, ४, ५ असा कोड आहे या बॉटल सुरक्षित असतात. या बॉटल तुम्ही एकपेक्षा अधिक वेळा वापरू शकता.
हे ही वाचा<< ट्रेन तिकीटावर लिहिलेलं ‘CURR_AVBL’ म्हणजे काय? ‘हा’ कोड कन्फर्म बर्थसह ‘असे’ वाचवतो तुमचे पैसे
PET किंवा PETE चा अर्थकाय ?
तुम्ही ज्या बॉटल घरी वापरता त्यांना बहुतांश वेळा PET किंवा PETE असा कोड असतो. हा प्लॅस्टिकच्या गुणवत्तेचा कोड आहे. उत्तम गुणवत्तेच्या प्लॅस्टिक बॉटल व डब्ब्यांना असा कोड असतो. हा कोड सुरक्षित असला तरी ही भांडी व बॉटल्ससुद्धा चार ते सहा महिन्याच्या अंतराने बदलायला हवी.