National Flag on Garments Rules : दरवर्षी २६ जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी खास आहे. यावर्षी देशातील नागरिक ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहेत. देशभरात मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा होतो. दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त एक वेगळा फॅशन ट्रेंड फॉलो केला जातो. अनेक जण आपल्या राष्ट्रध्वजातील तिरंगी रंगाचे टीशर्ट, कुर्ता परिधान करताना दिसतात. तसेच महिलाही यानिमित्त राष्ट्रीय ध्वजातील तीन रंग कपडे फॉलो करताना दिसतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, भारतीय ध्वज संहिता २००२ (india flag code २००२) मध्ये राष्ट्रध्वजाचे प्रिंट असलेले किंवा त्यासंबंधित कपडे परिधान करण्यासंदर्भात काही नियम ठरवून दिलेले आहेत, जे पाळणं आवश्यक आहे.

राष्ट्रध्वजाचा वापर करण्याबाबतचे कायदे

सरकारने वेळोवेळी जारी केलेल्या गैर-वैधानिक सूचनांव्यतिरिक्त, राष्ट्रीय ध्वजाचे प्रदर्शन राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध (सुधारणा) कायदा २००५ तसेच बोधचिन्ह आणि नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५० (प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट्स) च्या तरतुदींद्वारे नियंत्रित केले जाते.

National Institute of Nutrition job post
ICMR Recruitment 2024 : राष्ट्रीय पोषण संस्थेमध्ये विविध पदांवर होणार भरती! ‘इतक्या’ हजारांपर्यंत मिळणार पगार
indian economy marathi news
UNCTAD: भारताची अर्थव्यवस्था २०२४ मध्ये किती टक्क्यांनी वाढणार? संयुक्त राष्ट्राचा अहवाल जाहीर; व्याजदराचाही उल्लेख!
how VVPAT works
विरोधी पक्षांना EVM पेक्षा VVPAT मशीन का आवडते? राजकीय पक्षांना सर्व स्लिप्सची पडताळणी का हवी आहे?
Supreme Court understanding of Ajit Pawar group regarding use of clock symbol
वृत्तपत्रात निवेदन ठसठशीत छापा! सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला समज

भारतीय ध्वज संहिता २००२, राष्ट्रीय ध्वजाच्या वापराबाबत कायदे, पद्धती आणि नियम ठरवले जातात. भारतीय ध्वज संहितेत वेळोवेळी सुधारणा केल्या गेल्या असल्या, तरीही आपला राष्ट्रध्वज कोणत्याही गणवेश, पोशाख यांचा भाग म्हणून परिधान करण्यास किंवा त्याची छपाई किंवा अनुकरण करण्यास परवानगी नाही.

भारतीय ध्वज संहितेनुसार, ध्वजाचा कोणत्याही प्रकारच्या पोशाखाचा अथवा गणवेशाचा भाग म्हणून वापर करता येणार नाही. तसेच उशा, हातरुमाल, हातपुसणे यावर किंवा कोणत्याही पोशाख साहित्यावर ध्वजासंबंधित भरतकाम करता येणार नाही किंवा छपाई करण्यास मनाई आहे. ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहिता येत नाहीत.

तसेच सरकारची पूर्वपरवानगी आणि मंजुरी घेतल्यानंतरच कपड्यांवर राष्ट्रध्वजाच्या प्रिंटचा वापर करता येतो.

राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध (सुधारणा) कायदा, २००५ च्या कलम २ (ई) मध्ये असे म्हटले आहे की, भारतीय ध्वज व्यक्तीच्या कमरेच्या खाली परिधान केले जाणारे कपडे (अंडरगार्मेंट्स), गणवेश किंवा ॲक्सेसरीचा भाग म्हणून वापरला जाऊ नये. कोणत्याही ड्रेस मटेरिअलवर राष्ट्रध्वज छापू नये. भारतीय राष्ट्रध्वज विशिष्ट कपड्यांवर छापल्यास तो राष्ट्रध्वजाचा अपमान समजला जातो.

राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१ च्या कलम २ मध्ये असे नमूद केले आहे की, जो कोणी राष्ट्रध्वजाचा अनादर किंवा अवहेलना करेल त्याला ३ वर्षे कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

बोधचिन्ह आणि नावे (अयोग्य वापरास प्रतिबंध), १९५० चे कलम ३ नुसार, केंद्र सरकार किंवा केंद्रीय कार्यालयाच्या परवानगीशिवाय व्यापार, व्यवसाय, पेटंट, ट्रेडमार्क किंवा डिझाइनसाठी राष्ट्रध्वजाचे बोधचिन्ह आणि नावांचा अयोग्य वापर करण्यास परवानगी नाही. बोधचिन्ह या शब्दामध्ये ध्वज, शिक्का तसेच भारताच्या ध्वजाचे सचित्र प्रतिनिधित्व समाविष्ट आहे.

भारतीय संविधानाच्या कलम ५१ अ (a) मध्ये असे म्हटले आहे की, भारतीय संविधानाचे पालन करणे, तसेच राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.

राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यामुळे झाली कारवाई

दरम्यान, २०२२ मध्ये Amazon या ऑनलाइन वेबसाईटने राष्ट्रध्वजाचे चित्र असणारे टी-शर्ट, सँडल, सिरॅमिक कप इत्यादी विक्रीसाठी ठेवले होते. यावेळी Amazon वर द प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट १९७१ च्या कलम २ (iv) आणि (v) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याआधीही राष्ट्रध्वजाचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे कायदेशीर कारवाई झाली होती.

२००७ मध्ये पुरुष क्रिकेट विश्वचषकाच्या प्रसारणादरम्यान निवेदिका अभिनेत्री मंदिरा बेदी हिने १६ देशांच्या झेंड्यांची प्रिंट असलेली साडी नेसली होती, यात भारतीय ध्वजदेखील होता. पण, भारतीय ध्वजाची प्रिंट साडीच्या अगदी तळाशी असल्याने त्याला मंदिरा हिचा सतत पाय लागत होता. या घटनेमुळे तिच्यावर द प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर (सुधारणा) कायदा, २००५ च्या कलम २ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खेळाडूंना त्यांच्या वस्तूंवर ध्वजाच्या प्रिंटचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली होती. याचा अर्थ खेळाडू हेल्मेट किंवा हातमोज्यांवर तिरंग्याचा प्रिंट वापरू शकत नाही. भारतीय ध्वज संहितेत नमूद केल्यानुसार, वेशभूषेवर तिरंग्याचा वापर करू नये, असे सांगत गृह मंत्रालयाने ही बंदी लागू केली होती.

काही वर्षांपूर्वी, डोअरमॅट्सवर भारतीय राष्ट्रध्वज वापरल्याबद्दल Amazon विरोधात जोरदार निदर्शने झाली होती. Amazon विरुद्ध कठोर कारवाई करून, तत्कालीन परराष्ट्र व्यवहार मंत्री, सुषमा स्वराज यांनी Amazonला उत्पादने काढून टाकण्यास आणि माफी मागण्यास सांगितले. असे न केल्यास Amazon च्या कोणत्याही अधिकाऱ्याला भारतीय व्हिसा दिला जाणार नाही आणि आधीच मंजूर झाल्यास तो रद्द केला जाईल, अशा सूचनाही दिल्या होत्या.

२०११ मध्ये भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकला, तेव्हा सेलिब्रिटींसह सर्व जण खांद्याभोवती राष्ट्रध्वज गुंडाळून आनंद व्यक्त करताना दिसले. यावेळी एका सामाजिक कार्यकर्त्याने शाहरुख खान तिरंगा उलटा धरून सेलिब्रेशन करत असतानाचे फोटो समोर आणले. पण, हे घडत असताना कोणाच्याही लक्षात आले नाही आणि नंतर तक्रार नोंदवण्यास उशीर झाला. यावेळी विविध वृत्तपत्रांमधून ‘शाहरुखवरदेखील द प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट, १९७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे छापण्यात आले.

यादरम्यान अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हेसुद्धा आपल्या शरीरावर ध्वज गुंडाळून सेलिब्रेशन करताना दिसले, जे अयोग्य आणि राष्ट्राचा अपमान करणारे कृत्य होते, असे अनेकांनी त्यावेळी म्हटले होते.

फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनसारख्या विविध ऑनलाइन साइट्सवर भारतीय राष्ट्रध्वजाचे प्रिंट असलेले टी-शर्ट आणि इतर कपडे विकले जातात. पण, यात काही आक्षेपार्ह गोष्टी दिसल्यास केंद्र सरकार आणि त्या संबंधित विभागाचे अधिकारी संबंधित साइटला त्यांचे उत्पादन काढून टाकण्यास सूचना करू शकतात, वेळप्रसंगी ऑनलाइन साइट्सद्वारे कठोर कारवाई किंवा माफी मागण्याचेही आवाहन करतात.

Republic Day 2024: ध्वजवंदन, पथसंचलन, चित्ररथ, पुरस्कार….कसा पार पडतो प्रजासत्ताक दिनाचा सोहळा?

तिरंग्याबाबत भारतीय ध्वज संहिता २०२२ सुधारणा नियम खालील प्रमाणे (Flag Code of India Amendments 2022)

१) जेव्हा ध्वज फडकवला जातो तेव्हा त्याला आदराचे स्थान दिले पाहिजे. तो अशा ठिकाणी स्थापन करायला हवा, जिथून तो स्पष्टपणे दृश्यमान आहे.

२) पूर्वी फक्त कापूस, पॉलिस्टर, लोकर, खादी इत्यादींपासून बनवलेले, हाताने बनवलेले झेंडे फडकवण्याची परवानगी होती, पण आता मशीनने तयार केलेले ध्वजही फडकवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

३) सरकारी इमारतींवरील ध्वज रविवारी आणि इतर सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकवले जातात आणि विशेष प्रसंगी रात्रीही फडकवता येतात.

४) यापूर्वी केवळ दिवसा ध्वज फडकवण्याची परवानगी होती, मात्र सरकारने नियम बदलला आहे. तो दिवसा किंवा रात्री २४ तास फडकवता येतो.

५) ध्वजाचा आकार आयताकृती असावा. त्याची लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर ३२ असावे. अशोक चक्राला २४ आरे असावेत आणि ते पांढऱ्या पट्ट्याच्या मध्यभागी असावे.

६) ध्वज नेहमी उत्साहाने फडकावा आणि हळूवारपणे आणि आदराने खाली उतरवावा. फडकवताना आणि खाली करताना बिगुल वाजवला जात असेल तर फक्त बिगुलच्या आवाजानेच ध्वज फडकवला जाईल आणि खाली केला जाईल, याची काळजी घ्यावी.

७) इमारतीच्या खिडकीतून, बाल्कनीतून किंवा समोरच्या भागातून ध्वज आडवा किंवा तिरकस फडकवताना फक्त बिगुलच्या आवाजानेच ध्वज फडकवावा व खाली उतरवावा.

८)कोणत्याही परिस्थितीत तिरंग्याचा जमिनीला स्पर्श करू नये. राष्ट्रध्वजापेक्षा उंच कोणताही ध्वज फडकवता येत नाही.तसेच राष्ट्रध्वजाच्या बरोबरीने कोणताही ध्वज ठेवता येत नाही.

९) अधिकाऱ्याच्या गाडीवर ध्वज लावायचा असेल तर तो समोरच्या बाजूला, मध्यभागी किंवा गाडीच्या उजव्या बाजूला लावावा.

१०) ध्वजाच्या कोणत्याही भागाला जाळणे, नुकसान करणे किंवा शाब्दिक अपमान करणे यासाठी तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

११) ध्वजावर काहीही लिहू किंवा छापू शकत नाही. तिरंगा पूर्ण आदराने दुमडून ठेवावा लागतो, तो फेकणे आणि त्याचं नुकसान करणे प्रतिबंधित आहे.

१२)फाटलेला किंवा घाणेरडा ध्वज फडकावता येत नाही.

13) केवळ राष्ट्रीय शोकप्रसंगी ध्वज अर्ध्यावर ठेवला जातो.