शिलालेख, दामपत्र, ताडपत्र, भूर्जपत्र यांवर लिहिता लिहिता माणूस कागदावर लिहू लागला. अवघे जगच बदलून गेलं आणि मोठी क्रांती झाली. माणूस खऱ्या अर्थाने शक्तिमान बनला. हे स्थित्यंतर घडवलं ते एका कागदाने. आवडीच्या व्यक्तीला मनातील भावना ते एखादी सुख-दुःखाची माहिती घरच्यांपर्यंत पोहचवण्यासाठी पूर्वी कागदावर व्यक्त होऊन पत्र लिहिले जायचे. वर्तमानपत्राच्या छपाईसाठीसुद्धा कागदाचा वापर आजही केला जातो. तर आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे आयुष्य थोडं डिजिटल होत चालले आहे आणि मोबाइल, लॅपटॉप, संगणकाचा वापर संवादासाठी करण्यात येऊ लागला आहे. पण, असे असले तरीही आजही कागदाचे महत्व तितकंच अनमोल आहे.

तर तुम्ही कधी विचार केला आहे का की, आपण नेहमी कागदाला ‘पेपर’ का म्हणतो? पेपर हे नाव कागदाला का ठेवलं असेल? पेपर हा शब्द नेमका कुठून आला असेल? तर आज आपण या लेखातून कागदाला पेपर का म्हणतात, या विषयी जाणून घेणार आहोत. ‘कहाणी शब्दांची : मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात लेखक सदानंद कदम यांनी पेपर या शब्दाची एक रंजक कहाणी सांगितली आहे. लेखक सदानंद कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार पेपर हा शब्द एका वनस्पतीपासून ठेवण्यात आला होता.

Loksatta sanvidhan bhan Constitution Fundamental rights equal protection
संविधानभान: जनमते मानुस होत सब..
how to make Chilled and tasty Dahi Pohe recipe
थंडगार दही पोहे, एकदा खाल तर खातच राहाल, ही घ्या सोपी रेसिपी
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….
this is true love old couple eating in one plate
याला म्हणतात खरं प्रेम! एका ताटात जेवणाऱ्या आजी-आजोबांचा व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावूक

हेही वाचा…“भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो!” माणसाच्या आयुष्यात खिसा ‘हा’ शब्द नेमका आला तरी कुठून? जाणून घ्या… 

सुरवातीपासून कागदाला पेपर असे नाव होतं, जे आजही आहे. तर पेपर हे नाव एका वनस्पतीवरून ठेवण्यात आले आहे. इजिप्तमधील नाईल नदीच्या काठी ‘पपायरस’ नावाची वनस्पस्ती होती. या वनस्पतीच्या लगद्यापासून पातळ कागद तयार करण्यात आला. कागद पपायरस वनस्पतीपासून तयार केला गेला म्हणून त्याला नाव देण्यात आलं पेपर. पुढे मग कोणताही कागद असो, आपण त्याला पेपरच म्हणू लागलो. जसं की, छायाप्रत काढून देणारं पहिलं यंत्र तयार केलं ते झेरॉक्स कंपनीने. पण, कोणत्याही कंपनीच्या यंत्रावरून आपण छायाप्रत काढली तरीही तिला आपण झेरॉक्सच म्हणतो, अगदी तसंच…

कागदाचा उपयोग हा महत्त्वाचे मुद्दे पेपरावर उतरवणे, परीक्षेसाठी उत्तरपत्रिका म्हणून पेपराचा वापर करणे, लग्नात भेटवस्तू म्हणून पाकीट भरून देणे, कागदाच्या पिशव्या, केकचे बॉक्स, रंगीत कागदांचे पतंग, पताका आदी अनेक गोष्टींमध्ये होतो आणि पुढेही होत राहील. आता तर बाजारात गणपती बाप्पाच्या मूर्त्यादेखील कागदी असतात. तर कागदाची निर्मिती ही झाडांपासून होते, म्हणूनच आपण जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत आणि पर्यावरणाचे संरक्षणही करायला हवे.